त्सुनामीमध्ये हरवलेला पोलिस 16 वर्षांनी विचित्र अवस्थेत सापडला

tsunami.
tsunami.
Updated on

जकार्ता- 2004 मध्ये हिंदी महासागरात महाभयंकर भूकंप झाला होता. त्यामुळे आलेल्या त्सुनामीचा फटका अनेक देशांना बसला. ही त्सुनामी इतकी भयंकर होती की जवळपास 2 लाख 30 हजार लोकांचा यात मृत्यू झाला होता, तर अनेकजण बेपत्ता म्हणून घोषित करण्यात आले होते. लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं होतं,  त्याहून वाईट म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना शेवटचं पाहणंही अनेकांना नशीब झाले नाही. इंडोनेशियातील एक पोलिस अधिकारी 16 वर्षांपूर्वीच्या त्सुनामीपासून गायब झाला होता. तो आता एका मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये आढळला आहे. या व्यक्तीचा पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशातील फोटो आणि सध्या हॉस्पिटलमध्ये असलेला फोटो व्हायरल होत आहे. 

झेनल अबीदीन ( Zainal Abidin) हजारो हरवलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. 2004 च्या बॉक्सिंग डे सुनामीपासून तो गायब होता. तो मृत झाल्याचा सगळ्यांचाच समज होता, पण एका मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये तो सापडला. अबीदीन एका गाव प्रमुखाला 2009 मध्ये आढळून आला. त्यानंतर त्याला Banda Aceh येथील मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक वर्षापर्यंत त्याची ओळख पटली नाही. कारण त्याला काहीही आठवत नव्हते. 

काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात होती. ज्यात पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशातील व्यक्ती आणि एका हॉस्पिटल रुग्णाचा फोटो होता. फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि 16 वर्षांपूर्वी त्सुनामीमध्ये हरवलेला अबीदीन तोच असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या कुटुंबांशी याबाबत बोलणी केली. सध्या अबीदीन याची डीएनए टेस्ट केली जात आहे. असे असले तरी अबीदीन 2004 ते 2009 पर्यंत कोठे होता याबाबत खुलासा झालेला नाही. 

2004 चा महाभयंकर भूंकप
 
हिंदी महासागरात 2004 साली 9.1 मॅग्निट्यूटचा भूंकप झाला होता. इंडोनेशियाजवळ केंद्र असलेल्या या भूकंपाने या देशाला सर्वाधिक नुकसान पोहोचवले. याशियाव श्रीलंका, भारत, थायलंड आणि इतर 9 देशांमध्ये या त्सुनामीमुळे मृत्यूची नोंद झाली होती. जवळपास 57 फूटांच्या लाटा (17.4 मीटर) या भूकंपामुळे आल्या होत्या. त्सुनामीमुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात तब्बल 128,858 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत गेली. हजारो मृतदेह रत्त्यावर ठेवण्यात आले होते. अनेक मृतदेह तसेच सडून गेले. या काळात इंडोनेशियामध्ये जवळपास 570,000 लोकांचे स्थलांतर झाले, तर  179,000  इमारती आणि घरांचे नुकसान झाले. त्सुनामीचे वाईट अनुभव आजही लोकांच्या मनात कोरले गेले आहोत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.