इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) उद्या (रविवार) मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून याचे संकेत मिळत होते. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब चॅनेलचं नाव बदलल्यानं उद्या पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) जाहीर सभेत राजीनामा जाहीर करुन पद सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Political upheaval in Pakistan Imran Khan likely to resign tomorrow)
उद्या इम्रान खान यांनी स्वतः ही सभा बोलावली आहे. त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्सान (पीटीआय) या पक्षाचं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण विरोधी पक्ष इम्रान खान यांचं सरकार पाडण्यासाठी नॅशन असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहेत. इम्रान खान यांना देशांतर्गत आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यातच विरोधकांनी त्यांच्या सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब चॅनेलचं नाव बदललं
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनेलचं नाव अचानक बदलण्यात आलं आहे. यामुळं सर्वांच लक्ष या गोष्टीनं वेधून घेतलं आहे. यापूर्वी या चॅनेलचं नाव पंतप्रधान कार्यालयं असं होतं, ज्यावर ब्ल्यू टीक होती. पण आता याचं नाव बदलून इम्रान खान असं ठेवण्यात आलं आहे. इम्रान खान यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत २७ मार्च रोजी इस्लामाबादेतील परेड ग्राऊंडवर मोठ्या संख्येनं एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. उद्या आपण विरोधकांना जनसागर दाखवून असं पीटीआयनं इम्रान खान यांचा उल्लेख करत ट्विट केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.