World Population: 'त्या' बाळाच्या जन्मामुळे जगाची लोकसंख्या 800 कोटी झालीय

World Population
World Populationesakal
Updated on

नवी दिल्लीः आपल्या भारत देशाची लोकसंख्या १३५ कोटींहून अधिक आहे. पण जगाची लोकसंख्या किती? असा प्रश्न कधी पडलाय का? पण आज याचं उत्तर मिळालंय. आज जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एका बालकाने जन्म घेतला आणि जगाची लोकसंख्या ८०० कोटी इतकी झाली आहे.

जगामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झाल्याचं दिसून येतंय. युनायटेड नेशन या संस्थेने ही माहिती अपडेट केली आहे. आज जन्माला आलेलं मूल हे ८०० कोटी क्रमांकाचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली असली तरी चिंता व्यक्त करण्याची गरज नाहीये.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

साधारण २१व्या शतकाच्या शेवटी जगाची लोकसंख्या १० बिलियन म्हणजे एक हजार कोटी होईल, असा अंदाज आहे. परंतु त्यानंतर जन्मदर कमी होणार आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढणार नाही, अशी माहिती युनायटेड नेशनने दिली आहे.

World Population
Fake Currency: ''नकली नोटा चलनात आणणं दहशतवादी कृत्यासारखं'' 2015च्या केसमध्ये चौघांना १२ वर्षांची शिक्षा

भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा येणार असल्याचं बोललं जातं आहे. गुजरातमध्ये यासंबंधी एक समितीदेखील गठीत करण्यात आलेली आहे. 'एक देश, एक कायदा' यासाठी केंद्र सरकार पावलं टाकीत असल्याचं मागील काही घटनाक्रमांवरुन दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.