इस्राइलला अमेरिकेची मोठी मदत! बायडन यांनी मंजूर केले 8 अब्ज डॉलरचे आपत्कालीन लष्करी मदत पॅकेज

Israel War
Israel War
Updated on

Israel War: इस्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध चांगलेच पेटले आहे. पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने आज (शनिवार) सकाळी इस्राइलर एकामागून एक 5 हजार रॉकेट डागले. हे सर्व हल्ले अवघ्या 20 मिनिटांत झाले. या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की हमासच्या हल्ल्यानंतर इस्राईलच्या प्रत्युत्तरादाखल गाझामध्ये 198 लोक मरण पावले, तर 1,610 जखमी झाले. दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने इस्राइलला मोठी मदत केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्राइलला 8 अब्ज डॉलर किमतीचे आपत्कालीन लष्करी मदत पॅकेज मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्राइलच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सर्वप्रथम युद्धाची घोषणा केली. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. यामध्ये तीन कृती आराखडे ठरविण्यात आले आहेत.

Israel War
Israel Attack: इस्त्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर; मोदी सरकारकडून तेथील भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

नेतन्याहू म्हणाले की, आज सकाळपासून इस्राइल युद्धाच्या स्थितीत आहे. आमच्या प्रदेशात घुसखोरी करणाऱ्या विरोधी शक्तींना दूर करणे आणि ज्या समुदायांवर हल्ला झाला आहे त्यांची सुरक्षा आणि शांतता पुनर्संचयित करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे.

आमचे दुसरे उद्दिष्ट गाझा पट्टीतील शत्रूंना धडा शिकवणे आहे आणि तिसरं उद्देश सर्व आघाड्या मजबूत करणे आहे, जेणेकरून चुकूनही कोणीही या युद्धात अडकू नये. आम्ही युद्धात आहोत. अशा परिस्थितीत सर्वांनी संयम राखण्याची गरज आहे. मी इस्राइलच्या सर्व नागरिकांना आमचे उच्च ध्येय म्हणजेच युद्धात विजय मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो, असे नेतान्याहू म्हणाले.

Israel War
Gaza Declares War : राष्ट्रीय सुरक्षा मंत्र्यांनी इस्राईलमध्ये केली आणीबाणीची घोषणा; आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.