अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने युक्रेन चिंतेत आहे. युक्रेन रशियाविरुद्धच्या जवळपास तीन वर्षांच्या युद्धात परदेशी लष्करी मदतीवर अवलंबून आहे. विशेषत: रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला अमेरिकेने दिलेल्या लष्करी आणि आर्थिक मदतीवर ट्रम्प यांनी टीका केली आहे. अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवारी जिंकल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना एक हुशार 'सेल्समन' म्हटले.