दोन लग्नं, तिसरी जोडीदार; ब्रिटनचे पंतप्रधान आठव्यांदा झाले बाबा

दोन लग्नं, तिसरी जोडीदार; ब्रिटनचे पंतप्रधान आठव्यांदा झाले बाबा
Updated on

लंडन: ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आणि त्यांची पत्नी कॅरी (Boris Johnson and Carrie) यांनी आज गुरुवारी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची घोषणा केली आहे. बोरिस यांच्या कार्यालयाने म्हटलंय की, गुरुवारी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये या दाम्पत्याने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला आहे. याआधी इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये 33 वर्षीय कॅरी यांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा गर्भपात झाल्याचं सांगितलं होतं. त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा गर्भवती राहिल्याने आनंदी असल्याचंही कळवलं होतं. याआधी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या दाम्पत्याला विल्फ्रेड नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं होतं.

बोरिस जॉन्सन आणि कॅरी या दोघांनीही मार्च 2018 पासून सोबत राहतात. या वेळी जॉनसन परराष्ट्र सचिव होते. दोघांनीही 2019 च्या अखेरिस साखरपुडा केला होता. त्याच वर्षी 29 मे रोजी वेस्टमिन्स्टर कॅथेड्रलमध्ये ते मोजक्या लोकांसमोर लग्नाच्या बंधनात बांधले गेले. या लग्नामध्ये फक्त 30 जणांनी सहभाग घेतला होता. 57 वर्षीय बोरिस जॉन्सन यांनी याआधी दोनवेळा लग्न होतं तसेच त्यांना आधीच सहा मुले आहेत.

काय असेल नवजात मुलीचं नाव?

दाम्पत्याने अद्याप बाळाचं नाव काय असेल याबाबतची माहिती दिली नाहीये. जॉन्सन यांचा मुलगा विल्फ्रेडचं नाव बोरिस यांच्या आजोबांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. त्यांनी रॉयल एअरफोर्समध्ये सेवा केली होती. बोरिस यांच्या मुलाचं पूर्ण नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉनसन असं आहे. त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचं नाव काय असेल, हे पहावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()