PM Narendra Modi In USA : युएसए संघांचा चांगला प्रयत्न... क्रिकेटवरून नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये टोलेबाजी

PM Modi In US USA Cricket Team
PM Modi In US USA Cricket Teamesakal
Updated on

PM Modi In US USA Cricket Team : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भारत आणि युएसए यांच्यातील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी चर्चा होत आहे. गुरूवारी रात्री युएसएचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर आयोजित केली होती.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएसएच्या क्रिकेट संघाचे देखील कौतुक केले. त्यांनी युएसएचा क्रिकेट संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी पात्र होईल अशी आशा व्यक्त केली. मोदींच्या या वक्तव्यावर श्रोत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया मिळाली.

PM Modi In US USA Cricket Team
Ind vs Pak Football Match : फुटबॉल सामन्यादरम्यान भारत-पाकच्या खेळांडूमध्ये धक्काबुक्की; अन्यायकारक निर्णय सहन न करण्याचा निर्धार

व्हाईट हाऊसमधील स्टेट डिनरवेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'जरी युएसमध्ये बेसबॉलविषयी जास्त प्रेम असले तरी आता इथं क्रिकेट देखील लोकप्रीय होत आहे. अमेरिकन संघ भारतात या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये पात्र होण्यासाठी त्यांच्या परीने चांगले प्रयत्न करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशाची कामना करतो.'

PM Modi In US USA Cricket Team
BCCI Selector : नव्या सिलेक्टरच्या शोधात; बीसीसीआयने मागवले अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसमधील स्टेट डिनरसाठी जवळपास 400 हून अधिक अतिथी उपस्थित होते. या कार्याक्रमासाठी व्हाईट हाऊसमधील साऊथ लॉन विशेष पद्धतीने सजवण्यात आले होते.

या डिनर नाईटमध्ये जोशुआ बेल या अमेरिकन व्हायोलिनिस्ट यांचा संगीतमय कार्यक्रम देखील झाला. जोशुआ हे ग्रॅमी पुरस्कार प्राप्त व्हायोलिनिस्ट आहेत. ते सध्या सेंट मार्टिन अकॅडमीचे संगीत संचालक म्हणून काम करत आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.