PM Modi in Sydney: PM मोदी म्हणाले, 2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केले, मी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिक पार्कमध्ये 20 हजार भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करत आहेत
Prime Minister Narendra Modi  speech 20000 members present in Sydney stadium
Prime Minister Narendra Modi speech 20000 members present in Sydney stadium
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिक पार्कमध्ये 20 हजार भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी 2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केले, असं मोदी संबोधित करताना म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी समुदायाच्या कार्यक्रमात "लिटिल इंडिया" गेटवेची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अल्बानीज यांचे आभार मानले.

2014 मध्ये दिलेले वचन पूर्ण केले

पीएम मोदी म्हणाले, "मी 2014 मध्ये आलो तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिले होते. वचन दिले होते की, तुम्हाला भारताच्या पंतप्रधानपदासाठी 28 वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आज मी पुन्हा तुमच्यासमोर आहे. एकटा आलो नाही, मी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत आलो आहे, त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला, यावरून तुमची आम्हा भारतीयांप्रती असलेली आपुलकी दिसून येते.

लिटिल इंडियाची पायाभरणी

ऑस्ट्रेलियाचे भारतावर किती प्रेम आहे. या वर्षी मला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. आज त्यांनी लिटिल इंडियाच्या पायाभरणीचे अनावरण करण्याची संधी दिली आहे. मी त्यांचे आभार मानतो. (Marathi Tajya Batmya)

तसेच, भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संबंधांचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक केले. ऑसी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निधनामुळे लाखो भारतीय दु:खी झाले होते. अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियन मोठ्या मनाचे लोक

मला आनंद आहे की न्यू साउथ वेल्समधील परदेशातील भारतीय समुदायातील अनेक लोक सार्वजनिक जीवनात सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि स्वत:चा ठसा उमटवत आहेत. खरे तर ऑस्ट्रेलियन लोक मोठ्या मनाचे आहेत.

केवळ चित्रपटचं नाही तर...

क्रिकेटने आपल्याल दोन देशांना वर्षानुवर्षे जोडले आहे. आता टेनिस आणि चित्रपटांमुळेही आपल्यात संबंध जोडले जात आहेत. आमची खाण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी आता मास्टर शेफ आम्हाला जोडत आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताची ही विविधता खुल्या मनाने स्वीकारली आहे. यामुळेच परमात्म्याचे शहर परमात्मा चौक बनले आहे.(Marathi Tajya Batmya)

दोन्ही देशांमधील संबंध हे ३ 'सी', 'डी' आणि 'ई' यांच्या माध्यमातून

यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संबंधांची बाराखडी सांगितली. दोन्ही देशांमधील संबंध हे ३ 'सी', 'डी' आणि 'ई' यांच्या माध्यमातून सांगण्यात येत होते. मात्र, हे संबंध याहून कितीतरी अधिक आहेत. दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित आहेत, असं ते म्हणाले.(Marathi Tajya Batmya)

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध 3Cs- कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी द्वारे परिभाषित केले जातात. नंतर असे म्हटले गेले की आमच्या संबंधांची व्याख्या 'लोकशाही, डायस्पोरा आणि दोस्ती. काही लोकांनी असेही म्हटले की आमचे नाते ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि शिक्षणावर अवलंबून आहे. पण माझा विश्वास आहे की भारत-ऑस्ट्रेलियाचे नाते या पलीकडे आहे.

लखनौची चाट, जयपूरची जलेबी... सिडनीत पंतप्रधान मोदींकडून उल्लेख

मी ऐकले आहे की, हॅरिस पार्क येथील जयपूर स्वीट्समधील 'चाट' आणि 'जलेबी' अतिशय स्वादिष्ट आहेत. तुम्ही सर्वांनी माझा मित्र ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे.(Marathi Tajya Batmya)

टॅलेंट फॅक्टरी भारतात

भारताकडे क्षमतेची कमतरता नाही. भारतातही संसाधनांची कमतरता नाही. आज जगातील सर्वात मोठी आणि तरुण टॅलेंट फॅक्टरी भारतात आहे.

भारतीय बँकांचा डंका सातासमुद्रापार

जागतिक हेडविंड्सला कोणी आव्हान देत असेल तर ते भारत आहे. आज अनेक देशांतील बँकिंग व्यवस्था अडचणीत आहे पण दुसरीकडे, भारतातील बँकांच्या ताकदीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिडनीत भारताचा डंका

पंतप्रधान मोदींनी विचारले- ज्या देशाने कोरोना महामारीमध्ये जगातील सर्वात जलद लसीकरण कार्यक्रम राबवला... तो देश आहे- भारत. आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश...भारत आहे. आज, जगातील नंबर 1 स्मार्टफोन डेटा वापरणारा देश आहे- भारत. भारताकडे क्षमतेची कमतरता नाही, भारताकडे संसाधनांचीही कमतरता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.