Israel–Hamas War: इस्राइलमध्ये सरकारविरोधात तीव्र निदर्शने, हमासच्या बंदिवासातून ओलीसांना सोडवण्याची मागणी

Israel–Hamas War: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, हजारो निदर्शकांनी शनिवारी तेल अवीवमध्ये एक मोठी रॅली काढली आणि हमासच्या बंदिवासातून ओलीस सोडण्याची मागणी केली.
Israel–Hamas War
Israel–Hamas WarEsakal
Updated on

इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, हजारो निदर्शकांनी शनिवारी तेल अवीवमध्ये एक मोठी रॅली काढली आणि हमासच्या बंदिवासातून ओलीस सोडण्याची मागणी केली. हातात इस्रायली झेंडे घेऊन निदर्शक इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात घोषणा देत होते.

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्राइलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हे युद्ध सुरू झाले. नेतन्याहू यांच्या युद्ध हाताळण्याच्या पद्धतीबाबत गेल्या 9 महिन्यांत इस्राइलच्या शहरांमध्ये दर आठवड्याला अशी मोठी निदर्शने होत आहेत.

Israel–Hamas War
Loki Dinosaur : सुरीसारखी शिंगे, 5 टन वजन; मार्वलमधील 'लोकी'ची आठवण करून देणाऱ्या डायनोसरच्या नव्या प्रजातीचा शोध

३७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

इस्रायली माहितीनुसार, गाझामध्ये इस्राइलची जमीन आणि हवाई कारवाई सुरू झाली जेव्हा हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्राइलवर हल्ला केला, यामध्ये सुमारे 1,200 लोक मारले आणि 250 हून अधिक ओलीस आहेत.

पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्राइलच्या हल्ल्याने गाझा उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये आतापर्यंत 37,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी गेल्या 24 तासांत 101 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास संपूर्ण लोकसंख्या बेघर आणि निराधार झाले आहे.

Israel–Hamas War
Hinduja family: घरकाम करण्यासाठी भारतातून नोकर घेऊन जायचे, अन्...; ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत हिंदुजा कुटुंबाला तुरुंगवास का झाला?

विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावण्यांवर हल्ला

इस्रायली सुरक्षा दलांनी शुक्रवारी गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहराबाहेर विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावण्यांवर गोळीबार केला, ज्यात किमान 25 लोक ठार आणि 50 जखमी झाले. गाझाचे आरोग्य मंत्रालय आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली.

इस्राइलचे म्हणणे आहे की, ते हमासचे दहशतवादी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत आणि नागरिकांचा मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, मोठ्या संख्येने नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्राइलने दहशतवाद्यांना जबाबदार धरले आणि दहशतवादी लोकांमध्ये गुप्तपणे काम केल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले.

Israel–Hamas War
Pakistan Mob Lynching: पाकिस्तानात पर्यटकाला जिवंत जाळलं! महिन्याभरात ईशनिंदेची घडली दुसरी घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.