UAEची पहिली महिला कॅप्टन बनली 'ही' महिला, होतेय भारी चर्चा

या सुंदरीने मोडला UAEचा इतिहास, बनली पहिली महिला कॅप्टन
becoming UAE First Female Caption these women broke history of UAE
becoming UAE First Female Caption these women broke history of UAEesakal
Updated on

यूएईची पायलट आइशा अल मंसूरी संयुक्त अरब अमीरातची पहिली महिला कमर्शियल कॅप्टन बनली आहे. यूएईच्या एविशनमध्ये पहिली महिला कॅप्टन बनत या महिलेने यूएईचा इतिहासच पालटलाय. ३३ वर्षीय यूएईची निवासी आइशाने तिच्या करियरची सुरूवात २००७ मध्ये केली होती. त्यावेळी तिने प्रसिद्ध एतिहाद एयरलाईन्स सोबत कमर्शियल पायलट म्हणून काम केलं होतं. तिच्या यशानंतर आता आइशाचं नावं सगळीकडे चर्चेत आहे. (becoming UAE First Female Caption these women broke history of UAE)

एतिहादमध्ये ट्रेनिंगनंतर आइशा सुपरजंबो एयरक्राफ्ट Airbus A380ने उंच भरारी घेणारी पहिला ठरली. (UAE) ज्यानंतर तिने परत एकदा आइशा कॅप्टन रँकवर प्रमोशन मिळवत इतिहासात तिचं नाव नोंदवलंय.

आइशाचा प्रवास खडतर होता

कॅप्टनचा रँक मिळवण्यासाठी आइशाला एतिहादमध्ये एक प्रोग्राम पूर्ण करावा लागला. यासोबतच कॅप्टन रँकसाठी काही तासांचा फ्लाइंग एक्सपिरीयंसही (Airline)असावा लागतो, जो आइशाजवळ होता. याशिवाय तिने यूएई जनरल सिविल एविएशन अॅथॉरीटीची परीक्षाही पास केलीय. ही परीक्षा पास केल्यानंतरच तिला कॅप्टन रँक मिळालाय.

becoming UAE First Female Caption these women broke history of UAE
Airlines : अमेरिकेत वादळाचा कहर; 6 हजारहून अधिक उड्डाणं रद्द

आइशाच्या या यशानंतर तिच्या यशाची कारकीर्द देशविदेशात पोहोचली असून सगळीकडून तिच्या दमदार कामगिरीचं कौतुक होतंय. संयुक्त अरब अमीरातमध्ये अॅविएशन फिल्डमध्ये महिलांच्या प्रवेशाने विकासाची नवी वाटचाल सुरू होणार असल्याचं एतिहादचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मोहम्मद अल बुलूकी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.