Russia Ukraine Crisis : युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव टाका; ‘जी-७’ गटाच्या सदस्य राष्ट्रांचे संयुक्त निवेदन

‘जी-७’ नेत्यांची चीनकडे मागणी; वर्चस्ववादाबद्दल चिंता व्यक्त
put pressure on Russia to prevent war Statement of Member States G-7 Group russia ukraine war crisis
put pressure on Russia to prevent war Statement of Member States G-7 Group russia ukraine war crisisSakal
Updated on

हिरोशिमा : युक्रेनविरोधातील युद्ध थांबविण्यासाठी चीनने त्यांचा सामरिक भागीदार रशियावर दबाव टाकावा, अशी संयुक्त मागणी ‘जी-७’ गटातील शक्तीशाली लोकशाहीवादी देशांनी शनिवारी चीनला केली.

put pressure on Russia to prevent war Statement of Member States G-7 Group russia ukraine war crisis
Russia Ukraine Crisis: रशियाकडून युक्रेनवर पुन्हा ड्रोन हल्ले; चार नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी

जी-७’ गटाच्या सदस्य राष्ट्रांचे संयुक्त निवेदन आज प्रकाशित करण्यात आले. चीनचे नुकसान व्हावे, असे आम्हाला काहीही करायचे नाही. जागतिक शक्ती म्हणून चीनचा उदय रोखण्याचा प्रयत्न ‘जी-७’ करीत असल्याच्या आरोपांचा प्रतिकार या निवेदनात केला आहे. आमची धोरणे चीनला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेली नाहीत किंवा आम्ही चीनची आर्थिक प्रगती व विकास रोखू इच्छित नाही, अशी भूमिका नेत्यांनी घेतली.

चीनबरोबरील संबंधांचे महत्त्व ओळखून आणि आमची चिंता थेट चीनपुढे मांडण्यासाठी चीनशी स्थिर आणि विधायक संबंध आम्हाला हवे आहेत. युक्रेनवरील आक्रमण थांबविण्यासाठी आणि युक्रेनमधील संपूर्ण सैन्य तातडीने बिनशर्त मागे घेण्यासाठी चीनने रशियावर दबाब टाकावा, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

put pressure on Russia to prevent war Statement of Member States G-7 Group russia ukraine war crisis
Russia Crude Oil: 'या' देशाने खोडा घातला म्हणून भारताला रशियन तेलाच्या सवलतीवर सोडावे लागणार पाणी

प्रादेशिक अखंडतेवर आधारित सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही चीनला प्रोत्साहित करत आहोत. तसेच युक्रेनशी थेट चर्चा करण्यासह संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सनदीतील तत्त्वे आणि उद्देशांचे पालन करण्याचे आवाहनही करीत आहोत. जागतिक पातळीवरील चीनचे स्थान आणि आर्थिक बळ पाहता चीनशी सहकार्य आवश्‍यक आहे, असे मत नेत्यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.

आर्थिक स्थैर्यासाठी काम

हवामान बदल, जैवविविधता, कर्ज आणि असुरक्षित देशांच्या आर्थिक गरजा, जागतिक आरोग्यविषयक मुद्दे आणि आर्थिक स्थैर्य यासारख्या आव्हानांवर एकत्र काम करण्यावर भर देण्यात आला आहे.चीनकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतानाच पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील परिस्थितीवर ‘जी-७’ नेत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

या भागात चीन त्यांच्या सैन्यदलांचे वर्चस्व वाढवीत असून तैवानवर नियंत्रण ठेवण्यासाठी बळाचा वापरण्याची धमकी देत आहे. या मुद्यावर लक्ष वेधतानाच तैवानवरील चीनच्या दाव्यावर शांतपणे तोडगा काढण्याचे आवाहन सात राष्ट्रप्रमुखांनी केले आहे. दक्षिण चीन समुद्रात सागरी वर्चस्व विस्तारासाठी चीन करीत असलेल्या दाव्यांसाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता आणि आम्ही या प्रदेशात चीनच्या लष्करी कारवायांचा विरोध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बायडेन-मोदी गळाभेट

जपानच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ‘जी-७’ सदस्य देशांची बैठक सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हे स्वतः उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ आले आणि त्यांना आलिंगन दिले. बैठकीला सर्व सदस्य देशांचे नेते आसनस्थ झाल्यानंतर बायडेन हे त्यांच्या जागेवरून उठून मोदींच्या दिशेने आले. अमेरिकेचे अध्यक्ष आपल्याकडे येत असल्याचे पाहताच मोदीही खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यानंतर बायडेन यांनी मोदींना आलिंगन दिले. या गळाभेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आनंदाने संवादही साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.