लंडन : कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या (हूजूर पक्ष) नेतेपदी निवड झाल्यानंतर लिझ ट्रस यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण राणी एलिझाबेथ यांची भेट घेतल्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी अधिकृत नियुक्ती झाली आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार ब्रिटिश-भारतीय असलेले माजी मंत्री ऋषी सूनक यांना जोरदार टक्कर देत ट्रस यांनी पराभूत केलं. (Queen Elizabeth appoints Liz Truss as UK prime minister)
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लिझ ट्रस यांच्यासमोर महागाई, औद्योगिक पिछेहाट, आर्थिक मंदी या गोष्टींचे आव्हान आहे. जुलै महिन्यात देशात चलनवाढीचा दर १०.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राणी एलिझाबेथ यांच्या भेटीनंतर आता त्या ट्रस यांना पंतप्रधानपदाची शपथ देतील. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी अर्थात उद्याच त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून जातील.
पंतप्रधान निवासस्थानावरुन आज करणार संबोधन
राणी एलिझाबेथ यांनी थपथ दिल्यानंतर लिझ ट्रेस या लंडनला परततील. इथं पंतप्रधान अधिकृत निवासस्थान आहे. या ठिकाणाहून ते देशाला पहिल्यांदा संबोधित करतील. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता ते आपल्या मंत्रिमंडळाची निवड करतील. या सर्व मंत्र्यांना राणी एलिझाबेथ ऑनलाईन शपथ देतील. त्यानंतर या मंत्र्यांना त्यांच्या नावाचे ठसे सुपूर्द करण्याची परंपरा पार पडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.