जगातील अनेक समस्यांपैकी एक असलेल्या तापमान वाढीच्या मुद्द्यावर बहुतांश जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केलीय.
जगातील अनेक समस्यांपैकी एक असलेल्या तापमान (Temperature) वाढीच्या मुद्द्यावर बहुतांश जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केलीय. दरम्यान, या प्रकरणावर ठोस अशी पावलं उचलली जात नसल्यानं पर्यावरणवाद्यांकडून नेत्यांवर टीकाही केली जात आहे. आता ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांनी जागतिक नेत्यांना सुनावलंय. वातावरण बदलावर नेत्यांकडून फक्त चर्चा होतायत, त्यावर कोणतीच कृती होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. जे नेते आगामी COP26 परिषदेत हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर महाराणी एलिझाबेथ यांनी खरमरीत टीका केलीय.
वेल्श संसद उघडण्यासाठी गुरुवारी आल्यानंतर त्यांनी वातावरण बदलाबाबत प्रतिक्रिया दिलीय. संसदेचे अध्यक्ष एलिन जोनस् यांना एलिझाबेथ म्हणाल्या, की मी COP परिषदेबद्दल सर्व काही ऐकलं. पण, अजूनही परिषदेला कोण येणार आहे हे माहिती नाही. काही कल्पना नाही. हे खूपच अलौकिक असं आहे, नाही का? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला. पुढे एलिझाबेथ यांनी म्हटलंय, की मला फक्त कोण येणार नाही यांच्याबद्दलच माहिती आहे आणि हे खरंच वाईट आहे, ते बोलतात पण ते करत नाहीत अशा शब्दात एलिझाबेथ यांनी नाराजी व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्राची क्लायमेट परिषद ग्लासगोमध्ये दोन आठवडे भरणार आहे. ३१ ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या या परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार की नाही याबद्दल अद्याप स्पष्ट नाही. प्रिन्स चार्ल्सने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जगातील नेते फक्त चर्चा करतात याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कोणतीही प्रत्यक्ष कृती न करता नेत्यांच्या निव्वळ चर्चा चिंताजनक असल्याचं त्यांनी मुलाखतीवेळी म्हटलं होतं. प्रिन्स विल्यम्सनेसुद्धा याबाबत एका मुलाखतीत म्हटलं होतं, की आपण अंतराळात जाण्याऐवजी पृथ्वी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याविषयी महाराणी एलिझाबेथ यांना विचारले असता, त्यांनी आपण मुलाखत वाचली असल्याचं उत्तर दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.