लंडन: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2015 साली आपल्या लंडन दौऱ्यामध्ये राज्य सरकारद्वारे रविंद्रनाथ टागोर यांचं घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता ही इमारत विक्रीसाठी तयार झाली आहे. भारताचं ऐतिहासिक महत्त्व दाखवणाऱ्या या बिल्डींगची किंमत 2,699,500 डॉलर म्हणजेच 27.3 कोटी रुपये इतकी निश्चित झाली आहे. लंडनमध्ये प्रॉपर्टीच्या किंमती आणि लोकेशनच्या हिशेबाने ही किंमत फार कमी असल्याचं म्हटलं जातंय. 1912 साली काही महिन्यांसाठी रविंद्रनाथ टागोर हे उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेडमधील 'ब्लू प्लाक'मध्ये राहिले होते.
2015 साली लंडनमधील आपल्या पहिल्या यात्रेदरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, ज्या ठिकाणी रविंद्रनाथ टागोर रहायचे ते घर खरेदी करायची माझ्या सरकारची इच्छा आहे. ही एक खासगी संपत्ती आहे यासाठी मी आमच्या उच्चायुक्तांना (त्यावेळचे रंजन मथाई) यासंदर्भात बोलले होते की, आपण यासंदर्भात काही व्यवहार करु शकतो का ते पहावं. त्यावेळी ही संपत्ती विकण्यात येणार नव्हती मात्र, आता त्या संपत्तीची किंमत निश्चित करण्यात आली आहे.
या घरावर आधीपासूनच निळ्या रंगाच्या एका पट्टीवर लिहलंय की, इथे भारतातील सुप्रसिद्ध कवी रविंद्रनाथ टागोर राहत होते. या निळ्या रंगाची प्लेट लंडन कंट्री काऊन्सिलने लावली होती. मात्र, आता त्या घराची जबाबदारी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टकडे आहे. टागोरांशिवाय इतर काही भारतीयांच्या नावे देखील अशीच निळी पट्टी लंडनमध्ये लावल्या गेल्या आहेत. यामध्ये महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, अरबिंदो, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक सावरकर यांचा यात समावेश आहे. टागोरांच्या नावावर लावलेल्या निळ्या पट्टीवर लिहलंय, 'रविंद्रनाथ टागोर, 1861-1941, 1912 मध्ये भारतीय कवि याठिकाणी राहिले होते.'
पश्चिम बंगाल सरकारद्वारे हे घर खरेदी केले जाण्याच्या इच्छेवर भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय की, भारत सरकार अथवा पश्चिम बंगाल सरकारकडून ही संपत्ती खरेदी केली जाऊ शकते. 2015 साली ममता बॅनर्जी जेंव्हा लंडनला गेल्या होत्या तेंव्हा स्वराज पॉल यांनी त्यांना चहापानासाठी बोलावलं होतं. पॉल यांनी म्हटलं होतं की, टागोर बिल्डींगला खरेदी करण्यासाठी सरकार एक कमिटी देखील तयार करु शकते. जर मला त्या समाविष् केलं तर मला आनंदच होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.