Pakistan: पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले ; पंतप्रधानांची कबुली

 pakistan Prime Minister Anvarul Hak Kakar
pakistan Prime Minister Anvarul Hak Kakarsakal
Updated on

Pakistan: अफगाणिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेणाऱ्या तालिबानचे एकेकाळी समर्थन करणाऱ्या आणि अनेक दहशतवादी संघटनांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा चांगलाच दणका बसला आहे. काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले असल्याची कबुलीच पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वरुल हक काकर यांनी नुकतीच दिली आहे.

 pakistan Prime Minister Anvarul Hak Kakar
Pakistan Fined : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतरही पाकिस्तानला धक्का! ICC ने केली मोठी कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

कट्टर इस्लामवादी असलेल्या तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. यामुळे पाकिस्तानला विरोध करणाऱ्या दहशतवादी गटांवर, विशेषत: तेहरिके तालिबान पाकिस्तानसारख्या संघटनांवर कारवाई होण्याची आणि पाकिस्तानविरोधातील कारवाईसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर न होण्याची आशा पाकिस्तान सरकारला वाटली होती. मात्र, पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होण्याऐवजी मागील दोन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी आणि आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाण ५०० टक्क्यांनी वाढल्याची खंत हंगामी पंतप्रधान काकर यांनी व्यक्त केली आहे.

शस्त्रे अमेरिकी बनावटीची

अफगाणिस्तान सोडताना एकही शस्त्र मागे सोडले नसल्याचा दावा अमेरिकेने नुकताच केला असला तरी अफगाणिस्तानमधील दहशतवादी पाकिस्तानविरोधात अमेरिकी बनावटीच्याच शस्त्रांचाच वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान काकर यांनी केला आहे. अमेरिकी बनावटीची शस्त्रे काळ्या बाजारात सर्रास मिळत असून पाकिस्तानसह अफगाणिस्तान आणि अरब देशांमध्येही ती उपलब्ध होत असल्याची तक्रार पाकिस्तान सरकारने केली आहे.

 pakistan Prime Minister Anvarul Hak Kakar
Pakistan News : पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला, मियांवाली एअरबेसमध्ये घुसले दहशतवादी; जोरदार गोळीबार सुरू

दहशतवादी घडामोडी (२०२१-२०२३)

- २,२६७ : लोकांचा मृत्यू

- १५ : आत्मघाती हल्लेखोरांपैकी अफगाणी

- अनेक मशिदींवरही हल्ले

- तालिबानला हल्ल्यांची पूर्वकल्पना

- हल्ल्यांमध्ये अनेक सैनिकांचा मृत्यू

- दहशतवाद्यांना तालिबानचे पाठबळ

 pakistan Prime Minister Anvarul Hak Kakar
Pakistan Team : 'कडक सुरक्षेमुळे पाकिस्तानची खराब कामगिरी?' कोचचे धक्कादायक विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.