नवी दिल्ली- पाकिस्तान सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाने घेरलं आहे. त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. असे असताना पाकिस्तानला आता उंदरांनी त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या संसदमध्ये उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संसदेमध्ये मांजरं भरती केले जाणार आहेत.
रिपोर्टनुसार, सरकारी दस्ताऐवजांचे सरंक्षण करण्यासाठी पाकिस्तान कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने मांजरं पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १२ लाख पाकिस्तानी रुपयांचे बजेट देखील मंजूर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये सध्या उंदरांचं राज्य सुरु आहे. त्यामुळेच या उंदरांचा नाश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.