World Record : रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला, अवघ्या १५ तासात पोहोचली शिखरावर

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे
World Record
World Recordesakal
Updated on

World Record :  

नेपाळच्या गिर्यारोहक फुंजो झांगमु लामाने अवघ्या १४ तास ३१ मिनिटांच्या कालावधीत एका महिलेद्वारे एव्हरेस्टच्या जगातील सर्वात वेगवान चढाईचा विक्रम नोंदविला आहे. फुंजो लामा यांनी ही कामगिरी करून स्वत:चाच विक्रम मोडला आहे. याआधी यापूर्वी फुंजो लामा यांनी २०१८ मध्ये ३९ तास ६ मिनिटांत गिर्यारोहण पूर्ण केले होते.

नेपाळी वंशाच्या महिला गिर्यारोहकाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.  या महिला गिर्यारोहकाने १५ तासांपेक्षा कमी कालावधीत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे.

World Record
Mount Meru : माऊंट मेरुच्या चढाईचा थरारक अनुभव...

पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या फुंजो लामा यांनी गुरुवारी सकाळी ६.३ वाजता ८,८४८ मीटरची चढाई केली. त्यांनी ८,८४८.८६ मीटर (२९.०३१ फूट) एव्हरेस्ट डोंगरावर स्केलिंग केले. हिमालयातील शिखराला सर करण्याचा तिचा हा तिसरा प्रयत्न होता.

लामा यांनी बुधवारी दुपारी ३.५२ वाजता बेस कॅम्पवरून चढाई सुरू केली आणि गुरुवारी सकाळी ६.२३ वाजता शिखर गाठले. तिने बेस कॅम्पवरून १४ तास ३१ मिनिटांत शिखर गाठले आहे.

World Record
Mount Everest: माउंट एव्हरेस्टवर 'ट्रॅफिक जॅम'; लांब रांगेत थांबलेल्या गिर्यारोहकाचा व्हिडिओ व्हायरल

याआधी नेपाळच्या दिग्गज गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी बुधवारी ३० व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास रचला होता. शेर्पाने १० दिवसांपूर्वी जगातील सर्वात उंच शिखरावर चढाई करण्याचा स्वतःचा विक्रम मोडला होता.

माउंट एव्हरेस्ट पर्वत

माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतरांगातील ह्या शिखराची उंची 8,848.86 मीटर इतकी आहे. एव्हरेस्ट पर्वत नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये एव्हरेस्ट पर्वताला ‘सागरमाथा’ म्हणून ओळखतात, तर तिबेटमध्ये ‘चोमो लुंग्मा’ म्हणतात.

कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले गेले आहे. सर जॉर्ज एव्हरेस्ट हे 1840 साली ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्टवर पहिली चढाई 1953 साली ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.