ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या 'खुर्चीसाठी' लिझ ट्रस आणि ऋषि सुनक यांच्यात मोठी स्पर्धा आहे.
लंडन : ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या (British Prime Minister) 'खुर्चीसाठी' लिझ ट्रस (Liz Truss) आणि ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्यात मोठी स्पर्धा आहे. ऋषि सुनक सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पिछाडीवर आहेत. मात्र, यादरम्यान त्यांनी जनतेला एक मोठं आश्वासन दिलंय.
सुनक म्हणाले, जर मी देशाचा पंतप्रधान झालो तर वीज बिलावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) रद्द करणार आहे. सुनक यांच्या कर धोरणांत हा एक मोठा बदल झालेला पहायला मिळतोय. कारण, सुनक सुरुवातीपासूनच किफायतशीर धोरणांपासून दूर राहतील, असा आग्रह धरत आहेत. माजी अर्थमंत्री ऋषि सुनक पुढं म्हणाले, व्हॅट हटवल्यामुळं एका वर्षात सरासरी घरगुती ग्राहकांना £160 आणि अंदाजे 15,500 ची बचत होणार आहे. सुनक यांनी तीन महिन्यांपूर्वी अर्थमंत्री असताना ऊर्जा बिलात कपात करण्यास नकार दिला होता. त्यादरम्यान त्यांनी सांगितलं की, कुटुंबांना ही मोठी मदत होणार नाहीय. पण, आता ऋषि सुनक यांनी हे धोरण आणण्याचा निर्णय घेतलाय. तसं त्यांनी आश्वासनही दिलंय.
अनेक वादानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळं आता ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाचा शोध सुरूय. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य ऑगस्टमध्ये मतदान करतील आणि 5 सप्टेंबर रोजी नवीन पंतप्रधानांची घोषणा केली जाईल. ऋषि सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. लिझ यांनी वचन दिलंय की, त्या मोठ्या प्रमाणावर कर कपात करतील. यासोबतच त्यांनी ऋषि यांना बेजबाबदारही म्हटलंय.
YouGov पोलनुसार, गेल्या आठवड्यात कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमधील मतदानात लिझ ट्रस यांना ऋषि सुनक यांच्यापेक्षा 24 टक्के अधिक मतं मिळाली. ऋषि सुनक यांच्या योजना अंमलात आल्यास ब्रिटनमध्ये मंदी येईल, असा इशारा लिझ यांनी दिलाय. सर्वेक्षणानुसार, लिझ ट्रस यांना 720 सदस्यांपैकी 62 टक्के सदस्यांची पहिली पसंती आहे. त्याचवेळी 38 टक्के लोकांनी ऋषि सुनक यांना पसंती दिलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.