ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होणार आहेत. याचा आनंद अनेक भारतीयांना झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले ऋषी सुनक यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मोरडॉन्ट यांनी यूके पंतप्रधान होण्याच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर लगेचच ट्विटरवर मीम्सचा पाऊस सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
ट्विटरवरील काही वापरकर्त्यांच्या मते 42 वर्षीय सुनक हे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आशिष नेहरासारखे दिसतात. त्यामुळे अनेक यूजपर्सनी ऋषी सुनक यांच्यासाठी अभिनंदन संदेश पोस्ट करताना चक्क आशिष नेहराचे फोटो वापरले आहेत.आता तुम्हीच खालचे काही ट्विट पाहा आणि ऋषी सुनक आशिष नेहरासारखे दिसतात की नाही हे ठरवा..
कोहिनूर हा105.6 कॅरेटचा हिरा बऱ्याचदा चर्चेत असतो. हा हिरा भारतात 14व्या शतकात सापडला आणि शतकानुशतके तो अनेकांच्या ताब्यात होता. दरम्यान 1849 मध्ये, ब्रिटिशांनी पंजाबवर कब्जा केल्यानंतर, हिरा राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. तेव्हापासून हा ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा भाग आहे. याबद्दल देखील नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स पोस्ट केल्या आहेत.
ऋषी सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाले आहे. ट्विटर वापरकर्त्यांनी याबद्दल देखील मिम्स पोस्ट केल्या आहेत. यूकेचे पंतप्रधान म्हणून सुनक यांची निवड झाल्याबद्दल शेकडो मजेदार ट्विट करण्यात आले आहेत.ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे उद्या किंग चार्ल्स यांची भेट घेतील आणि त्यानंतर अधिकृतपणे ब्रिटनचे पंतप्रधानपद स्वीकारतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.