युद्धामुळे बालकांमध्ये कुपोषण वाढण्याचा धोका

उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता
Risk child malnutrition due war
Risk child malnutrition due warSakal
Updated on

बैरुत : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या देशांमधून होणारी अन्नधान्याची निर्यात ठप्प झाल्याने उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील देशांमधील बालकांसमोर कुपोषणाचा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा ‘युनिसेफ’या संघटनेने दिला आहे.

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे अनेक गरीब देशांना आधीच मोठा फटका बसला असताना युक्रेन-रशिया युद्धामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जगात गहू आणि बार्लीच्या एकूण निर्यातीपैकी एक तृतियांश निर्यात युक्रेन आणि रशियामधूनच होते. मध्य आशियातील देश या धान्य पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. याशिवाय, या दोन देशांमधून इतर धान्ये आणि सूर्यफुल तेलाचीही मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

युद्ध सुरु झाल्यानंतर रशियावर बहुतेक देशांनी निर्बंध घातल्याने आणि युक्रेन निर्यात करण्याच्या स्थितीत न उरल्याने हा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोट्यवधी बालकांना कुपोषणाला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा ‘युनिसेफ’ने दिला आहे. सध्या रमझानचा महिना सुरु असतानाच अन्नाची कमतरता निर्माण झाली असल्याने गरीब मुस्लिम कुटुंबांनाही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

महागाईचा भडका

युद्धाची स्थिती कायम राहिल्यास मध्य आशिया आणि आफ्रिकेतील बालकांच्या आरोग्यावर आणखी गंभीर परिणाम होण्याचा इशारा ‘युनिसेफ’ने दिला आहे. विशेषत:, इजिप्त, लेबनॉन, सुदान, लीबिया, सीरिया आणि येमेन या देशांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असून येथील अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. यातच युक्रेन युद्धामुळे येथे अचानक महागाईचा भडका उसळला आहे. या देशांमधील नागरिकांची क्रयशक्ती कमी झालेली असल्याने आपल्या कुटुंबाचे योग्य पोषण करण्यात कमवत्या व्यक्तींची प्रचंड दमछाक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()