जिनेव्हा : कोरोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन' (Omicron variant) हा जगासाठी 'अत्यंत' धोकादायक असल्याचं प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization) आज सोमवारी याबाबतचा इशारा देताना म्हटलंय की, अत्यंत संक्रमणकारी आणि धोकादायक असणाऱ्याया विषाणूबाबतची अनिश्चितता कायम आहे. WHO ने पुढे म्हटलंय की, जर या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा मोठी लाट आली तर त्याचे परिणाम हे अत्यंत गंभीर असू शकतात. मात्र, अद्यापपर्यंत तरी ओमिक्रॉन व्हेरियंटशी निगडीत एकही मृत्यूची नोंद झालेली नाहीये.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या शुक्रवारी कोरोनाच्या या B.1.1.529 व्हेरियंटचे नामकरण करुन त्याचं नाव ओमिक्रॉन असं ठेवलं आहे. सर्वांत आधी हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून तो हळूहळू आपले पाय पसरत आहे. कोरोनाचे इतर व्हेरियंट डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा यांच्याप्रकारेच ओमिक्रॉन देखील 'अत्यंत चिंताकारक' अशा वर्गीकरणात मोडतो. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध पुन्हा एकदा लादले आहेत.
दरम्यान, जगाला पुन्हा भीतीच्या छायेत घेऊन जाणाऱ्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. इटालियन संशोधकांच्या टीमने या विषाणूचे फोटो प्रकाशित केले आहेत. या टीमनं म्हटलं, या नव्या फोटोच्या तीन पद्धतींनी अभ्यास केल्यानंतर हा नवा व्हेरियंट स्वतःला मानवाप्रमाणं बदलत असल्याचं हे समोर आलंय. स्वतःला तो परिस्थीतीशी जुळवून घेत आहे. त्याचबरोबर तो सातत्यानं म्युटेट होत असल्याचंही या संशोधकांनी म्हटलं आहे.
मानवी पेशींच्या संपर्कात येतोय हा नवा व्हेरियंट
संशोधकांनी म्हटलंय की, मानवाच्या शरिरात जिथं प्रथिनं आहेत त्या प्रत्येक भागात ओमिक्रॉन अस्तित्वात असून तो सातत्यानं मावनी पेशींच्या संपर्कात आहे. पण याचा अर्थ असा नाही की, हा खूपच जास्त किंवा कमी धोकादायक आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, हा व्हेरियंट डेल्टा किंवा इतर अन्य व्हेरियंटच्या तुलनेत किती धोकादायक आहे याच्या माहितीसाठी यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.