Rolls-Royce Layoffs: जगात महागड्या आणि लक्झरी ब्रँडच्या गाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रोल्स रॉइस या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहेत अस एका अहवालात सांगण्यात आलं आहे..
द टाईम्सने अहवालात म्हटले आहे की, लक्झरी कार तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत सल्ला देण्यासाठी मॅकिन्से अँड कंपनीच्या नेतृत्वाखालील सल्लागारांची नियुक्ती केली आहे. कंपनी जागभरातील कर्मचार्यांमधून 3,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. कंपनीने आपले कामकाज सुधारण्यासाठी या निर्णयाची तयारी केली आहे.
अनेक विभागांचे विलीनीकरण योजना
द टाइम्सने दिलेल्या अहवाल नुसार, कंपनीने रोल्स-रॉइसच्या नागरी एरोस्पेस, संरक्षण आणि उर्जा प्रणाली विभागातील प्रत्येक नॉन-मॅन्युफॅक्चरिंग विभागांचे विलीनीकरण करण्याचा विचार करत आहे. रोल्स रॉयसच्या कंपनीने सांगितले की, कंपनी अनेक नवनवीन प्रकल्पांवर काम करत आहे. कर्मचारी काढण्याची उद्देश कंपनीच्या कामकाजात सुधारणा करणे हा आहे.
कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका मुख्य कार्यालयाला बसणार आहे
ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, आम्ही कर्मचारी कपातीबाबत निर्णय घेतलेला नाही आणि कोणत्याही सूचना केल्या नाहीत. जर कपात झाली तर सर्वात जास्त नुकसान रोल्स-रॉयसच्या मुख्यालयाचे होईल. कारण त्यातील बहुतांश कर्मचारी बॅक-ऑफिसमध्ये आहे.
दरम्यान जागतिक स्तरावर अनेक मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदी केली आहे. यामध्ये Meta, Amazon, Twitter, Microsoft आणि इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. अगदी अलीकडे, अमेरिकेतील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या बँकेने 500 कर्मचार्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.