माद्रिद : ‘नाटो’ ने रशियाला थेट ‘धोका’ तर चीनला जागतिक स्थैर्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे जाहीर केल्यानंतर हे दोन्ही देश चांगलेच खवळले आहेत. येथे पार पडलेल्या संघटनेच्या दोन दिवसीय संमेलनामध्ये विविध सुरक्षाविषयक आव्हानांवर चर्चा करण्यात आली. ‘नाटो’च्या सदस्य देशांनी फिनलंड आणि स्वीडन या दोन देशांना या आघाडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या देशांच्या सहभागाला मान्यता मिळाल्यास रशियाला लागून असलेली १ हजार ३०० किलोमीटरची सीमा थेट नाटोच्या ताब्यात येऊ शकेल.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी याआधीच या दोन्ही देशांना ‘नाटो’शी हातमिळवणी केल्यास अथवा त्यांचा भूभाग हा इतर देशांना वापरण्याची परवानगी दिल्यास याची जबर किंमत मोजावी लागू शकेल असा इशारा दिला आहे. चीनने देखील ‘नाटो’च्या भूमिकेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. ‘नाटो’ द्वेषमूलक भावनेतून आमच्या देशाला कलंकित करण्याचे काम करत असल्याचा आरोप चीनने केला आहे.
स्नेक आयलंडमधून रशियाची माघार
मॉस्कोः रशियाने आज सहानुभूतीचा दावा करताना युक्रेनच्या काळ्या समुद्रातील स्नेक आयलंड येथून सैन्य माघारीची घोषणा केली आहे. युक्रेनच्या बंदरांवर अडकून पडलेला अन्नधान्य साठ्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून रशियाकडून हे पाऊल उचलण्यात आले. रशियाचा हा निर्णय ‘नाटो’च्या दबावापोटी घेण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे युक्रेनच्या अन्य भागांतील रशियाचे हल्ले सुरूच आहेत. ब्रिटनने युक्रेनला १.२ अब्ज डॉलर निधी दिल्याने हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.