रशिया सरकारने सैनिकांना दिली अजब ऑफर; अमेरिकन लढाऊ विमानं पाडण्यासाठी मिळतील इतकं पैसे

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन लढाऊ विमाने F-15 आणि F-16 पाडण्यासाठी बक्षीस जाहिर केलं आहे.
russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets
russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets
Updated on

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या सैनिकांना अजब ऑफर दिली आहे. जो कोणी प्रथम अमेरिकन लढाऊ विमाने F-15 आणि F-16 पाडेल त्याला सरकारकडून 15 दशलक्ष रूबल मिळतील. म्हणजेच बक्षीस म्हणून 1.41 कोटी रुपये मिळतील. यापूर्वीही रशियाने आपल्या सैनिकांना अशाप्रकारे ऑफर दिली होती. (russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets )

रशियाने आपल्या सैनिकांना युक्रेनची F-15 आणि F-16 लढाऊ विमाने पाडणाऱ्याला 1.41 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली आहे. याआधीही युक्रेनचे रणगाडे नष्ट करणाऱ्या रशियन सैनिकांना बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आणि बक्षीसही देण्यात आले. पाश्चिमात्य आणि युरोपीय देश युक्रेनला शेकडो लढाऊ विमाने देत आहेत, जेणेकरून ते रशियाचा सामना करू शकेल.

russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets
India-Russia: भारताचा खरा मित्र! रशियामध्ये किती भारतीय राहतात? त्याठिकाणी जाऊन कोणतं काम करतात? जाणून घ्या

आता रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकन लढाऊ विमाने F-15 आणि F-16 पाडण्यासाठी बक्षीस जाहिर केलं आहे. 16 जुलैला रशियन तेल ड्रिलिंग उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने हे बक्षीस जाहीर केलं आहे. या वृत्ताला रशियन न्यूज एजन्सी TASS नेही दुजोरा दिला आहे.

कंपनीचे सामाजिक कार्य उपकार्यकारी संचालक इल्या पोटॅनिन यांनी एक व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली आहे. युक्रेनमध्ये अमेरिकन लढाऊ विमाने पाडणाऱ्या रशियन सैनिकाला हे बक्षीस मिळेल, असे त्यात म्हटले आहे. युक्रेनियन रणगाडे नष्ट केल्याबद्दल काही रशियन सैनिकांना सन्मानित करण्यात येत असताना ही घोषणा करण्यात आली आहे.

russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets
PM Modi In Russia: 'ये अमर प्रेम की कहानी है...' रशियातील भारतीयांसमोर मोदी असं का म्हणाले?

पहिलं टँक नष्ट करणाऱ्याला किती मिळाले पैसे

यापूर्वी फोर्स कंपनीचे सीईओ सर्गेई श्मोत्येव यांनी जूनमध्ये अशीच घोषणा केली होती. सर्गेईने सांगितले होते की, पहिला युक्रेनियन टँक नष्ट करणाऱ्या सैनिकाला ५० लाख रुबल म्हणजेच ४.७३ कोटी रुपये आणि त्यानंतरच्या टाक्या नष्ट करण्यासाठी ५ लाख रुबल म्हणजेच ४७.५० लाख रुपये मिळतील. हे पैसे दिले जात होते, त्यानंतर लढाऊ विमान पाडणाऱ्याला बक्षीस जाहीर केले जात होते.

युरोपीय देश जगभर लढाऊ विमाने दान करत आहेत

सध्या डच आणि डॅनिश सरकार युक्रेनला संयुक्तपणे F-16 लढाऊ विमाने पुरवत आहेत. युक्रेनला या लढाऊ विमानांची पहिली खेप लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होत आहे. युरोपीय देशांनी संयुक्तपणे युक्रेनला ८५ F-16 लढाऊ विमाने देण्यास सांगितले आहे. जेणेकरून युक्रेनची ताकद वाढू शकेल.

russia announces 141 crore rupees to destroy each ukrainian f 15 and f 16 fighting falcon fighter jets
India–Russia : रशियाच्या लष्करी सेवेतून भारतीयांची मुक्तता;भारत सरकारची मागणी मान्य, मायदेशात पाठविण्याचीही तयारी

F-16 फायटर जेट धोकादायक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे

नॉर्वे आणि बेल्जियम 50 हून अधिक F-16 लढाऊ विमाने दान करण्यास तयार आहेत. ही जेट विमाने 2028 पर्यंत युक्रेनला दिली जातील. नॉर्वे आपल्या बाजूने 22 लढाऊ विमाने पाठवणार आहे.

F-16 ही अशी लढाऊ विमाने आहेत जी AIM-9L साइडवाइंडर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. हे क्षेपणास्त्र रशियाचे रणगाडे, विमाने आणि शस्त्रे नष्ट करेल. याशिवाय AIM-120 हे प्रगत मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे.

जमिनीवर हल्ला करण्यासाठी या लढाऊ विमानांमध्ये AGM-65G Maverick, GBU-12, GBU-24, GBU-31 आणि JDAM बॉम्ब बसवले जाऊ शकतात. हे फायटर जेट 20 मिमीच्या व्हल्कन तोफेने सुसज्ज आहे. म्हणजे समोरून येणाऱ्या लढाऊ विमानांवर प्राणघातक हल्ला केला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.