Russia Ukraine War: प्रेयसीवर 111 वेळा चाकू हल्ला करणाऱ्या कैद्याची सुटका; युक्रेनविरुद्ध युद्धात सहभागी झाल्याने सरकारचं बक्षीस

व्लादिस्लाव कान्युसने वेरा पेक्तेलेवावर 3 तास अत्याचार केले, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर धारदार शस्त्राने 111 वेळा हल्ला केला. यानंतर त्याने वेराची लोखंडी केबलने गळा आवळून हत्या केली.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarEsakal
Updated on

युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढल्यानंतर रशियामध्ये हत्येसाठी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीला माफ करण्यात आले आहे. या व्यक्तीने त्याच्या प्रेयसीवर 111 वेळा चाकूने वार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. व्लादिस्लाव कान्युस (२७) नावाच्या या व्यक्तीला रशियाने आपल्या 'कन्विक्ट रिक्रूटमेंट' धोरणांतर्गत युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी भरती केले होते.(Latest Marathi News)

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिस्लाव कान्युसला गेल्या वर्षी त्याची 23 वर्षीय मैत्रीण वेरा पेक्तेलेवा हिच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 17 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्याने एक वर्षापेक्षा कमी शिक्षा भोगली आणि आता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वेराने कान्युसशी संबंध तोडले होते, ज्यामुळे त्याला राग आला आणि त्याने तिची निर्घृण हत्या केली होती.

Russia Ukraine War
Israel Hamas War: गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची टंचाई, युद्धामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

व्लादिस्लाव कान्युसने वेरा पेक्तेलेवावर 3 तास अत्याचार केले, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर धारदार शस्त्राने 111 वेळा हल्ला केला. यानंतर त्याने वेराची लोखंडी केबलने गळा आवळून हत्या केली. वेराची आई ओक्साना म्हणाली की, हा आमच्यासाठी खुप मोठा धक्का आहे. (Marathi Tajya Batmya)

Russia Ukraine War
Israel Hamas War : "शस्त्रसंधी करण्यात इस्राईलचे हित", इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे प्रतिपादन; नेतान्याहूंनी झुगारला जागतिक दबाव

क्रेमलिनने अध्यक्ष पुतिन यांच्या या निर्णयाचे केले समर्थन

महिला हक्क कार्यकर्त्या अलोना पोपोव्हा यांनी सांगितले की, तुरुंग अधिकाऱ्यांनी व्लादिस्लाव कान्युसची सुटका आणि युक्रेनच्या सीमेजवळील दक्षिण रशियातील रोस्तोव येथे हस्तांतरण झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी एक अधिकृत पत्र दाखवले, ज्यात लिहिले होते, 'कान्युसला माफ करण्यात आले आहे आणि त्याची शिक्षा 27 एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या आदेशाने संपुष्टात आली आहे.'

दरम्यान, एएफपीच्या वृत्तानुसार, क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निर्णयाचा बचाव केला आणि सांगितले की, युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवलेले रशियन कैदी 'त्यांचे रक्त सांडून' त्यांच्या गुन्ह्यांचे प्रायश्चित करत आहेत.

Russia Ukraine War
AI CEO Mika : जगातील पहिली एआय-सीईओ समोर; मस्क-झुकरबर्ग यांच्याहूनही सरस काम, सुट्टीही नाही घेत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.