Russia News : रशियातील बंड थांबवण्यासाठी झाली 'ही' मोठी डील! भीतीने मॉस्कोतून पळाले पुतिन?

russia coup deal between wagner group yevgeny prigozhin vladimir putin flee moscow
russia coup deal between wagner group yevgeny prigozhin vladimir putin flee moscow Sakal
Updated on

रशियाच्या वॅगनर ग्रुपचा चिफ येवगेनी प्रिगोझिनचे सशस्त्र बंड आणि रशियातील सत्ता उलटवून टाकण्याचा प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. मॉस्को आणि येवगेनी प्रिगोझिन यांच्यात डील झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सत्तापालट करण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला आहे. येवगेनी प्रिगोझिन आणि मॉस्को यांच्यात ही डील बेलारूसचे राष्ट्रपती एलेक्झेंडर लुकाशेंको यांनी घडवून आणली आहे. येवगेनी प्रिगोझिन बेलारुसला जाणार असल्याचेही वृत्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, येवगेनी प्रिगोझिन आणि मॉस्को यांच्यात जी डील झाली त्यानुसार, रशियन सरकार प्रिगोझिन आणि त्यांच्या सैनिकांच्या विरोधात फाइल करण्यात आलेले सर्व गुन्हे वापस घेण्यात येतील. तसेच ज्या सैनिकांनी बंड केलं आणि रशियन शहरांचा ताबा घेतला त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केली जाणार नाही.

येवगेनी प्रिगोझिनन रशियन संरक्षणमंत्री सेग्रेई सोइगु आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ वालेरी गोरसिमोव यांना देखील पदावरून हटवण्याची मागणी केली होती. मात्र आतापर्यंत रशियाने या मागणीबाबत सार्वजनिक स्वरुपात कुठलेही उत्तर दिलेले नाहीये. तसेच येवगेनी प्रिगोझिनने त्याच्या सैनिकांना मॉस्कोवरून परत बोलवले आहे. तसेच सैनिकांना पुन्हा युक्रेनच्या आघाड्यांवर तैनात करण्यात आले आहे.

russia coup deal between wagner group yevgeny prigozhin vladimir putin flee moscow
Maharashtra Politics : "केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक दरवेळी गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात…"

पुतिन मॉस्कोतून पळाले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येवगेनी प्रिगोझिन याला त्याचे आफ्रिकेतील साम्रज्य सांभाळण्याची मुभा देण्यात आली आहे असे बोलले जात आहे. दरम्यान जेव्हा वॅगनर ग्रुपचे सैनिक मॉस्कोमध्ये दाखल झाले होते तेव्हा ब्लादिमीर पुतिन मॉस्को सोडून पळून गेले होते असेही सांगितले जात आहे.

युक्रेन सरकारचे एक सल्लागार अँटोन गेरास्चेंको ने ट्वीट करत पुतिन यांच्या विमानाने मॉस्कोवरून सेंट पीट्सबर्गसाठी उड्डाण केल्याची माहिती दिली होती. रिपोर्ट्सनुसार पुतिन यांच विमान उड्डाण घेतल्यानंतर १५० किलोमिटर अंतर पार केल्यानंतर रडाराहून गायब झालं होतं. मात्र क्रेमलिनने पुतिन यांनी मॉस्को सोडल्याचा दावा फेटाळला आहे.

russia coup deal between wagner group yevgeny prigozhin vladimir putin flee moscow
Russia Civil War : वॅगनर ग्रुपने घेतला रशियन लष्करी मुख्यालयाचा ताबा; मॉस्कोकडे करणार कूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.