रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युध्दाल एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. दोन्ही देशांना युध्दात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यातच रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हृदयविकाराचा झटका आला होता, असा दावा युक्रेनचे मंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी केला आहे.
पुतिन यांनी युक्रेनमधील त्यांच्या विशेष लष्करी मोहीम अपयशी झाल्याचा दोष संरक्षण मंत्र्यांना दिला होता. युक्रेनच्या मंत्र्याने दावा केला आहे की यामुळेच संरक्षण मंत्री, युद्धाचा दुसरे मास्टरमाइंड मानला जातात पण 11 मार्चपासून ते लोकांसमोर आलेले नाहीत. 24 मार्च रोजी रशियाचे संरक्षण मंत्री पुन्हा टेलिव्हिजनवर दिसले. मात्र हे फुटेज नवीन की जुने हे कळू शकलेले नाही.
त्याच्या अचानक गायब झाल्यामुळे असा अफवा पसरत आहेत की, खारकिव्ह किंवा किव्ह यासारखी प्रमुख युक्रेनियन शहरे अद्याप ताब्यात न घेतल्याबद्दल त्यांना क्रेमलिनने शिक्षा दिली आहे. गार्डियनच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, क्रेमलिनने आयोजित केलेल्या दैनंदिन पत्रकार बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. कारण पत्रकारांनी संरक्षणमंत्र्यांचा ठावठिकाणा विचारला होता.
दरम्यान क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे समजण्यासारखे आहे की संरक्षण मंत्री विशेष लष्करी ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत आणि त्यांच्यासाठी मीडियासोमोर बोलण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यानंतर लगेचच, पुतिन यांच्यासोबतच्या सुरक्षा परिषदेच्या टेलिकॉन्फरन्सच्या क्लिपमध्ये संरक्षण मंत्री टेलिव्हिजनवर दिसले, जिथे त्यांनी विशेष लष्करी मोहीमेच्या प्रगतीचा अहवाल दिल्याचे सांगण्यात आले. मात्र या व्हिडिओ फुटेजवर संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.