मॉस्को, (पीटीआय): युक्रेनमधील युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने मर्यादा ओलांडू नये, असा इशारा आज रशियाने दिला आहे. तसेच, संयम बाळगण्याची अमेरिकेची संवेदना लोप पावत असल्याचा टोमणाही रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी या वेळी लगावला.
एका मुलाखतीदरम्यान लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ‘‘युक्रेनला शस्त्रपुरवठा करून अमेरिकेने त्यांची स्वत:ची लाल रेषा (मर्यादा) ओलांडली आहे. मात्र, आम्ही इतरांसाठी ओढलेली लाल रेषा त्यांनी पार करू नये. या लाल रेषेच्या ते किती जवळ आहे, हे त्यांना माहिती आहे.