चीनचा रशियाला मदत करण्यास नकार,व्लादिमीर पुतीन यांना भारताकडून अपेक्षा

रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना भारताकडून अपेक्षा
PM Modi Talked To Vladmir Putin
PM Modi Talked To Vladmir Putine sakal
Updated on

युक्रेनवर सुरु असलेल्या युद्धा दरम्यान चीनने रशियाला मदत करण्यास नकार दिला आहे. बोईंग आणि एअरबस द्वारा यंत्र सामग्री पुरवठा थांबवल्यानंतर चीनकडे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या रशियाने आपला मोर्चा वळविला होता. मात्र चीनने रशियन एअरलाईन्सला विमानांसाठी लागणारी यंत्र सामग्री देण्यास नकार दिला आहे, असे राॅयटर्स या वृत्तसंस्थेने रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने दिली आहे. युक्रेनवर (Ukraine) रशियन हल्ल्यानंतर पाश्चात्य देशांकडून माॅस्कोवर सतत निर्बंध लावले जात आहेत. निर्बंधांच्या बाबतीत रशियाने उत्तर कोरिया आणि इराण आदी देशांना मागे सोडले आहे. (Russia Says China Not Willing To Supply Aircraft parts)

PM Modi Talked To Vladmir Putin
North Korea | पाकिस्तानवर उत्तर कोरिया नाराज, 'त्या' घटनेचा केला निषेध

भारताकडून मदतीची अपेक्षा

नुकतेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आठवड्यात इशारा दिला होता, की रशियन हवाई प्रवासांची सुरक्षा धोक्यात आली होती. इंटरफॅक्ससह इतर संस्थांनी विमानांचे उड्डाण सुरु ठेवण्यासाठी एक जबाबदार रशियन फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीचे अधिकारी वालेरी कुडिनोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की चीनने नकार दिल्यानंतर रशिया आता भारत (India) आणि तुर्कस्तान सारख्या देशांकडून मदतीची अपेक्षा ठेवत आहे. कुडिनोव्ह पुढे म्हणाले, की रशियन कंपन्या आपले विमानांची नोंदणी करित आहे. यात अनेकांची नोंदणी परदेशात झाली आहे. रशियात अमेरिका (America) आणि युरोपीय संघाच्या विमानांना प्रतिबंध केल्यानंतर त्यांना आशा आहे, की काही इतर लोक भाडे देणाऱ्या कंपन्यांना वापस केले जाईल. (Ukraine Russia Crisis)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()