रशियाला 6 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालं यश; अंगारा ए 5 स्पेस रॉकेट केलं लाँच

russia angara
russia angara
Updated on

मॉस्को - रशियाला गेल्या सहा वर्षांपासून अंगारा ए ५ स्पेस रॉकेटच्या लाँचिंगची प्रतिक्षा होती. सोमवारी रशियाने घोषणा केली की, रोस्कोस्मोसने सहा वर्षांत दुसऱ्यांदा त्यांच्या पहिल्या पोस्ट सोविएत रॉकेटची यशस्वी चाचणी केली.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही चाचणी राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. हेवी लिफ्ट अंगारा ए 5 स्पेस रॉकेटची यशस्वी चाचणी सोमवारी पार पडल्याची माहिती रशियाने दिली. अंगारा रॉकेट हे अंतराळ प्रक्षेपण करणाऱ्या व्हेइकल्सपैकी एक आहे. मॉस्कोतील का केंद्राकडून हे तयार केले जात असल्याचंही रशियाने म्हटलं आहे. 

अंगारा ए 5 स्पेस रॉकेटला 2014 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आलं होतं. प्रोटॉन एमला रशियाच्या एका हेवी लिफ्ट रॉकेटमध्ये बदलण्यासाठी अंगारा ए 5 स्पेस रॉकेट तयार करण्यात येत आहे. हे रॉकेट 20 टनांपेक्षा जास्त पेलोड ऑर्बिटमध्ये घेऊन जाऊ शकते. नव्या रॉकेटसाठी एक लाँच पॅड 2021 मध्ये ओपन करण्यात य़ेणार आहे.

सोमवारी रोस्कोस्मोसने सांगितले की, अंगारा ए 5 ने 12 मिनिटे 28 सेकंदासाठी उड्डाण केलं. रोस्कोस्मोसचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी एका ट्विटमधून यशस्वी प्रक्षेपणाचा आनंद व्यक्त केला. TASS ने सुद्धा अंगारा ए 5 च्या लाँचिंगचा व्हिडिओ प्रसारीत केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता असं सांगितलं आहे. 

अंगारा ए 5 चा उद्देश रशियाच्या वर्कहॉर्स प्रोटॉन लाँचर रॉकेटला यशस्वी करणं हा आहे. वोस्टॉक्नी कोस्मोड्रेम हे केंद्र भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांचे आऱोप आणि अनेक अपयशांचा सामना करत आहे. अशा वेळी आता अंगारा रॉकेटचं प्राथमिक प्रक्षेपण याठिकाणाहून केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंगारा मिशनला इतका काळ लागण्यामागे मॅन्युफॅक्चरिंगसाठी झालेला उशीर आणि तांत्रिक अडचणींचाही समावेश आहे. गेल्या वर्षी इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर सर्व प्रोजेक्ट अडकून पडला होता. संशोधकांचे म्हणणे आहे की, इंजिनमधील बिघाड उड्डाणावेळी त्याला संपूर्ण नष्ट करू शकत होता.

अंतराळ उद्योगाला पुन्हा चालना देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. अंगारा सोविएत युगानंतर विकसित करण्यात आलेल्या अंतराळ रॉकेटमधील नवीन रॉकेट आहे. 2014 मध्ये अंगारा ए 5 हेवी लिफ्ट लाँच वाहन आणि त्याचे लहान व्हर्जन 1.2 लाँच झाल्यानंतर अनेकदा अंगाराचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.