Ukraine-Russia War: PM मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोन

रशिया आणि युक्रेनमध्ये आता थेट युद्धाला सुरुवात झाली आहे.
Ukraine-Russia War: PM मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोन
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्याकाही दिवसांपासून युद्धाचे ढग जमा झाले होते. पण आजपासून प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियानं युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवलं असून युद्धासाठीची सर्वप्रकारची तयारी त्यांनी सुरु केली आहे. ठिकठिकाणी सैन्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. या युद्ध परिस्थितीचे सर्वंकष अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहता येईल. (Russia Ukraine Crisis live Updates Indian people rescue operation started)

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन कधीही युक्रेनचे रक्त आपल्या हातातून साफ ​​करू शकणार नाहीत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी संसदेत युक्रेनवर केलेल्या वक्तव्यात

  • आज पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना फोन लावला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेनच्या अलीकडील घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

  • पुढे पंतप्रधान मोदींनी हिंसाचार त्वरित थांबवण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे.

  • युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटंलय की, आज आपण जे ऐकलंय तो केवळ क्षेपणास्त्रांचे स्फोट, लढाई आणि विमानांचा गोंधळ नाही. हा नव्या लोखंडी पडद्याचा आवाज आहे, जो आता खाली आला आहे. आणि हा पडदा आता रशियाला सुसंस्कृत जगापासून दूर करत आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, हा पडदा आमच्या जमिनीवर पडणार नाही याची खात्री करणं हे आमचंही राष्ट्रीय कार्य आहे.

  • मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके
    युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके युक्रेनलगतच्या हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाक रिपब्लिक या देशांमध्ये पाठविली जाणार आहेत. युक्रेनमधील नागरिकांनी या पथकांमधील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हंगेरीमधील झाहोनी या सीमेवरील नाक्यावर जाणाऱ्या भारतीय पथकात तिघांचा समावेश आहे. एस. रामजी (व्हॉटसॲप क्रमांक +९१७३९५९८३९९०), अंकुर (+३६३०८६४४५९७) आणि मोहित नागपाल (+९१८९५०४९३०५९) यांचा पथकात समावेश आहे. पंकज गर्ग (+४८६०६७००१०५) हे पोलंडमधील क्रॅकोविक सीमेवर साह्य करणार आहेत. स्लोव्होक सीमेवरील व्हिस्न नेमेक येथे मनोजकुमार (+४२१९०८०२५२१२) आणि इव्हान कोझिंका (+४२१९०८४५८७२४) हे अधिकारी जाणार आहेत. तर रोमानिया येथील सीमेवर सकीव्हा येथे गौशुल अन्सारी (+४०७३१३४७७२८), उद्देश्‍य प्रियदर्शी ( +४०७२४३८२२८७), अँड्रा हॅरिओनोव्ह (+४०७६३५२८४५४) आणि मॅरियस सायमा (+४०७२२२२०८२३) हे अधिकारी जातील.

  • युक्रेनच्या राजधानीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आल्याची घोषणा तिथल्या महापौरांनी केली आहे.

  • रशियाचं ताबा मिळवणारं सैन्य चर्नोबिल ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 1986 च्या शोकांतिकेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमचे रक्षक आपले प्राण देत आहेत. स्वीडनच्या पंतप्रधानांना याची माहिती दिली आहे. ही संपूर्ण युरोप विरुद्ध युद्धाची घोषणा आहे: युक्रेनियन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की

  • युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यामध्ये मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या टीम हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक रिपब्लिक आणि रोमानियामध्ये युक्रेनच्या सीमेवर पाठवल्या जात आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून, युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय विद्यार्थ्यांशी राजदूतांनी संवाद साधत त्यांना धीर दिला.

  • युक्रेनमधील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आज सकाळी सिच्युएशन रूममध्ये राष्ट्रीय सुरक्षा दलाची भेट घेतली. यावेळी युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाला कसे जबाबदार धरता येईल यावर चर्चा करण्यात आल्याचे व्हाईट हाऊसतर्फे सांगण्यात आले आहे.

  • रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर बोलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • भारताने रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी विनंती भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केली होती. त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये मोदीच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीला सुरूवात झाली आहे.

  • युक्रेनचे लष्करी विमान कीवजवळ कोसळले विमानात 14 जण असल्याचे वृत्त

  • रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला युरोपियन इतिहासातील 'टर्निंग पॉईंट' असल्याचे मत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केले आहे.

  • रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीवर यूकेच्या परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी सांगितले.

  • गरज असल्याशिवाय घर न सोडण्याच्या तसेच बाहेर पडताना कागदपत्रे सोबत ठेवा, अशा सूचना युक्रेनमधील भारतीयांना भारतीय दूतावासाने दिल्या आहेत. स्वतःच्या बचावासाठी बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घेण्यासह सांगण्यात आले आहे.

  • आमचं सरकार विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत आणण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. भारताला शांतता हवी आहे आणि युद्धाला प्रोत्साहन देणारी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

  • युक्रेनच्या सैन्याने म्हटलंय की, रशियाने कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रांसह नागरी आणि लष्कराच्या पायाभूत सुविधांवर 30 हून अधिक हल्ले केले आहेत. - रॉयटर्स

  • कीवमधील युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या युनिटच्या क्षेत्रातून धूर निघत आहे.

  • धैर्याने आणि शांतीने परिस्थितीचा सामना करण्याची विनंती युक्रेनमधील भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. कीवमधील दूतावास नागरिकांसाठी खुले असून, अहोरात्र कार्यरत आहे. या कठिण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मिशन मोडवर काम करत असल्याचेही युक्रेनमधील भारताचे राजदूत पार्थ सत्पथी यांनी सांगितले आहे.

  • जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, शांतता राखा, असा सल्ला युक्रेनमधील भारतीय दूतावासाने जारी केला आहे.

  • 40 हून अधिक युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचे तसेच अनेकजण जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या सल्लागारांनी दिली आहे.

  • हे युद्ध थांबवण्यासाठी आम्ही भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याची वाट पाहत आहोत: डॉ. इगोर पोलिखा, युक्रेनचे भारतातील राजदूत

  • पन्नास रशियन घुसखोर ठार झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. तत्पूर्वी रशियाच्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये ७ जण ठार तर ९ युक्रेनमधील नागरिक जखमी झाल्याची माहिती युक्रेननं दिली होती.

  • युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना/विद्यार्थ्यांसाठी २४ फेब्रुवारी रोजी अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.