बायडेन यांचे पुतिन यांना चिमटे; वाचा भाषणातले 8 महत्वाचे मुद्दे

बायडेन यांचे पुतिन यांना चिमटे; वाचा भाषणातले 8 महत्वाचे मुद्दे
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आज स्टेट ऑफ द युनियनमध्ये भाषण करत युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका ठामपणे मांडली आहे. या भाषणात त्यांनी रशियावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. रशियावर वेगवेगळ्या स्वरुपाचे निर्बंध लादणार असल्याचं जाहीर करत आताच्या रशियाच्या दुर्दैवी अवस्थेला फक्त पुतिनच जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या भाषणातले दहा महत्त्वाचे मुद्दे...

बायडेन यांचे पुतिन यांना चिमटे; वाचा भाषणातले 8 महत्वाचे मुद्दे
रशियाला ताब्यात हवीत युक्रेनमधील 'ही' पाच शहरं; जाणून घ्या कारण
  • बायडन यांनी युक्रेनच्या लढ्याचं कौतुक केलं आहे. आर्थिक निर्बंध लादून रशियाची मोठी कोंडी करणार असल्याची घोषणा केली आहे. रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करणार असल्याचंही सांगितलं.

  • युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरवणार नाही, नाटो संरक्षणासाठी कटीबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.

  • अमेरिका युक्रेनला एक बिलीयन डॉलरचं अर्थसहाय्य करणार असून आम्ही युक्रेनसोबत आहोत. We Stand With You! अशी ठाम घोषणा केली आहे.

  • रशियाच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला फक्त व्लादिमीर पुतिनच जबाबदार असल्याचं छातीठोकपणे सांगितलं.

  • जेव्हा या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिनच्या युक्रेनवरील युद्धामुळे रशिया कमकुवत झाल्याचं लिहलं जाईल आणि उर्वरित जग अधिक मजबूत होईल.

  • सध्या रशियाचं स्टॉक मार्केट कोसळलं असून इतर मार्केट्समध्ये रशियन स्टॉक्सवर बंदी आहे.

  • आमच्या मित्रपक्षांसह, आम्ही युक्रेनियन लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या या लढ्यात पाठिंबा देत आहोत. लष्करी मदत, आर्थिक मदत, मानवतावादी मदत अशा स्वरुपाच्या मदत आम्ही देऊ आणि मदत करतच राहू. कारण ते त्यांच्या देशाचे रक्षण करत आहेत आणि त्यांचं आताचं दु:ख कमी करण्याचं काम आमची ही मदत करेल.

  • राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वाटलं की ते युक्रेनमध्ये घूसू शकतात आणि कसंही जग फिरु शकतात. मात्र, त्यांनी कधीही कल्पना केली नसेल अशी मजबूत भिंतीशी त्यांना सामना करावा लागला. कारण त्यांची भेट युक्रेनियन लोकांशी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.