Russia-Ukraine : ऑपरेशन गंगा’वर ‘स्वराज’नितीची छाप

रशिया, युक्रेनच्या नेतृत्वाशी मोदींनी चर्चा केल्याने मार्ग सुकर
Sushma Swaraj
Sushma Swarajsakal
Updated on

नवी दिल्ली: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारने वेगवान केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ या भारताच्या मोहिमेची आखणी ज्या प्रकारे केली आहे ती पाहता त्यावर माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी राबविलेल्या धोरणाचाही मोठा प्रभाव दिसून येतो. स्वराज यांनी येमेन युद्ध संकटाच्या काळात तेथील हजारो भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाच्या राजांबरोबर चर्चा करण्याची विनंती केली होती. मोदी यांची ती शिष्टाई यशस्वी होऊन केवळ ७ दिवसांत तब्बल ७ हजार नागरिकांना भारतात सुखरूप आणण्याची मोहीम स्वराज यांनी फत्ते केली होती.

Sushma Swaraj
Russia-Ukraine : आम्हाला तात्काळ भारतात न्या !

मोदी यांनी ताज्या संकटात प्रथम रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व नंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दीर्घ बातचीत केली त्यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची लवकरात लवकर व सुखरूप सुटका हाच विषय केंद्रस्थानी ठेवला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेला विलक्षण गती दिली. भारताने ४ वरिष्ठ मंत्र्यांना युक्रेनच्या नजीकच्या देशांत पाठविले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीतून मोहिमेचे संचलन करावे असे निर्देश मोदी यांनी दिले. स्वराज यांनी थेट अशीच मोहीम आखून ५ हजार भारतीयांची मुक्तता केली त्याच धर्तीवर पण विस्तारित स्वरूपात मोदींनी ताज्या युक्रेन संकटातील ‘ऑपरेशन गंगा‘ ची आखणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sushma Swaraj
Russia Ukraine War: जीव धोक्यात घालून भारतीय व्यावसायिकाने वाचवले शेकडोंचे प्राण

विरोधकांना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर अनेक देशांचा दौरा केला होता त्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. मोदी परराष्ट्र मंत्र्यांना बरोबर न घेता(स्वराज) एकटेच जातात यावरून राज्यसभेत विरोधकांनी मोठी आरडाओरड केली होती. स्वराज यांनी त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. मनमोहनसिंग यांनी किती वेळा परराष्ट्रमंत्र्यांना बरोबर नेले होते? असा सवाल करून निरुत्तर केले होते. तीन मूर्ती भवनातील एका कार्यक्रमात पंतप्रधानांचे विदेश दौरे मौजमस्तीसाठी, खासगी कामासाठी नसतात असा टोला लगावून स्वराज म्हणाल्या होत्या की, ‘‘ पंतप्रधान विमानातच असतात ही टीका करणे सोपे आहे पण मोदींच्या दौऱ्यांतून विविध देशांच्या नेतृत्वाबरोबर जे परस्पर संबंधांचे, मैत्रीचे घट्ट धागे विणले गेले त्यांची जबरदस्त ताकद भारताने व मी स्वतः वारंवार अजमावली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.