थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला

थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला
Updated on

नवी दिल्ली : युक्रेनवर रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता अधिकच वाढत चालली आहे. एकीकडे अमेरिका आणि इतर युरोपिय देशांनी याआधीच आपल्या राजदूतांना आणि नागरिकांना देशातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आता भारतानेही युद्धाच्या या सावटाखाली आपल्या देशाचे विद्यार्थी आणि नागरिकांनाही युक्रेन सोडण्याबाबत सल्ला दिला आहे. (Russo-Ukrainian War)

थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला
लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स
थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला
लवकरच आणखी एका महासाथीला तोंड द्यावं लागेल: बिल गेट्स

युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावासाने आज रविवारी जारी केलेल्या एका ऍडव्हायझरीमध्ये म्हटलंय की, युक्रेनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्या भारतीय नागरिकांनी त्या ठिकाणी थांबणं गरजेचं नाहीये अशांनी परत यावं. त्या ठिकाणच्या भारतीय विद्यार्थ्यांनीही तात्पुरत्या काळासाठी भारतात परतण्याची तयारी करावी. भारतीय विद्यार्थ्यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी चार्टर फ्लाईट्ससाठी आपल्या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधावा.

थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला
उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केसीआर यांनी घेतील शरद पवारांची भेट

रशिया आणि युक्रेनदरम्यान सध्या काय आहे परिस्थिती?

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचं वातावरण आहे. ॉयुद्ध करण्यासाठी आम्हाला कितीही चिथावणी दिली गेली तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही. तसेच, रशियाकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत,’ असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज स्पष्ट केले. युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर रशिया पुरस्कृत बंडखोरांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी म्युनिच येथे सुरु असलेल्या सुरक्षा परिषदेत आपली ठाम भूमिका मांडत पाश्‍चिमात्य देशांनाही आवर घालण्याचा प्रयत्न केला.

युक्रेनच्या पूर्व सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून सैन्य आणि बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमण होणार असल्याचा अमेरिकेचा आरोप आणि रशियाने केलेला इन्कार या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचे आणि अधिक तणाव निर्माण न करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की म्हणाले,‘‘रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवरही आम्ही भयभीत झालेलो नाही, आम्हाला आमचे सर्वसामान्य आयुष्य जगायचे आहे. पाश्‍चिमात्य देशांनी रशियाला लक्ष्य करण्यासाठीचे कारण शोधू नये. युक्रेनला सुरक्षेबाबत खात्री द्यावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.