युक्रेनमध्ये ऐन युध्दात 61000 हून जास्त Airbnb चं बुकिंग; कारण आहे खास

Russia Ukraine war 61000 Airbnb bookings in Ukraine amid war know the cool reason behind it
Russia Ukraine war 61000 Airbnb bookings in Ukraine amid war know the cool reason behind it
Updated on

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युध्द सुरु आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक युक्रेनियन लोक त्यांच्या देशातून पळून जात आहेत आणि तर भारतासह अनेक देश युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना बाहेर काढत आहेत, या सगळ्यामध्ये युक्रेनमधील घर भाड्याने देणारी कंपनी एअरबीएनबी (Airbnb) ची बुकिंग मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मग काय हे बुकिंग करणारे लोक खरंच युक्रेनमध्ये राहायला जाणार आहेत का? या जगभरातून होत असलेल्या बुकिंगमागचं कारण खूपच खास आहे. (61000 Airbnb bookings in Ukraine)

तर हे जगभरातून युक्रेनमध्ये Airbnb बुक करणारे लोक फक्त युध्दग्रस्त युक्रेनला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामध्ये यूएस मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की यापैकी बहुतेक बुकिंग अमेरिकेतून केल्या गेल्या आहेत. एअरबीएनबीच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सीएनएनने दिलेल्या रिपोर्टनुसार, 2 मार्च आणि 3 मार्च रोजी जगभरातील लोकांनी युक्रेनमध्ये 61,000 हून अधिक रात्रीचे बुकिंग करण्यात आले आहे.

"मला आशा आहे की तू आणि तुझे सुंदर अपार्टमेंट सुरक्षित असेल, हे भयंकर युद्ध संपावे… आणि युक्रेन सुरक्षित राहावा… मी एक दिवस येईन आणि तुम्हाला भेटेन, त्यावर विश्वास ठेवा, आणि जेव्हा आम्ही भेट देऊ, तेव्हा तुमच्यासोबत राहू. देव तुमचे आणि तुमच्या शहराचे आणि तुमच्या देशाचे रक्षण करेल, असे संदेश बुकिंगसोबत पाठवण्यात आले आहेत. तर या मेसेजला उत्तर देत "तुम्हाला शांतात असलेल्या किव्ह शहरात तुम्हाला पाहून आम्हाला आनंद होईल" एअरबीएनबीच्या मालकाने लिहिले आहे.

Russia Ukraine war 61000 Airbnb bookings in Ukraine amid war know the cool reason behind it
रशियाला आणखी एक आर्थिक झटका; व्हिसा, मास्टरकार्डने बंद केली सेवा

या संकटात इतर देशांतील Airbnb मालकांनी युक्रेन मधील Airbnb खोल्या बुक करणे सुरू केल्यानंतर आणि हे फक्त त्यांच्या Airbnb होस्टच्या मदतीसाठी आहे मेसेज त्यासोबत देण्यात आला आणि त्यानंतर आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरु झालेली ही मोहीम सोशल मीडिया वर रातोरात लोकप्रिय झाली.

वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या रिपोर्टमध्ये जेव्हा, Airbnb चे मुख्य कार्यकारी ब्रायन चेस्की यांनी अशा मेसेजपैकी एक रिट्विट केला तेव्हा मोहिमेला वेग आला. एअरबीएनबीने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यूएसमधील लोकांनी तब्बल 34,000 रात्री बुक केल्या होत्या, यूकेमधून 8,000 रात्री बुक केल्या आणि कॅनेडियन लोकांनी जवळपास 3,000 रात्री बुक केल्या होत्या आणि या सर्वांनी &1.9 मिलीयन यशस्वीपणे गोळा केले. कंपनीने सांगितले ,की त्यांनी बुकिंगसाठी सर्व सेवा शुल्क माफ केले आहे.

Russia Ukraine war 61000 Airbnb bookings in Ukraine amid war know the cool reason behind it
Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

Airbnb काय आहे?

Airbnb ही एक अमेरिकन ऑनलाइन वेबसाइट आणि App आहे ज्यावरून तुम्ही जगभरात कुठेही भाड्याने खोल्या बुक करू शकता. तुम्ही फिरायला जाताना तुम्हाला हवे तेथे खोली मिळवू शकता. तसेच तुमच्याकडे असलेल्या रिकामी खोली Airbnb वर भाड्याने देऊ शकता .

ही कंपनी बुकिंग केलेल्या ग्राहकांनी चेक इन केले की नाही याची पर्वा न करता चेक-इन तारखेनंतर Airbnb मालकाला पैसे देते. म्हणून, सध्या सोशल मीडियावर सर्वजण आता लोकांना युक्रेनियन एअरबीएनबी स्पेसेस लवकर बुक करण्याचे आवाहन करत आहेत जेणेकरून युक्रेनियन होस्टना लवकर पैसे मिळतील.

Russia Ukraine war 61000 Airbnb bookings in Ukraine amid war know the cool reason behind it
Tata Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लॉंच, मिळणार हे मस्त फीचर्स, पाहा किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.