रशियात आम्हाला सत्तांतर नको; ‘व्हाइट हाउस’चे घूमजाव

रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आम्हाला तेथे सत्तांतर नको असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले.
रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया
रशियाकडून तीव्र प्रतिक्रियाSakal
Updated on

वॉर्सा (पोलंड) : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची ‘कसाई’ शब्दांत निंदा करत अशी माणसे सत्तेत राहता कामा नये असे विधान करणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विधानावर व्हाइट हाउसला आज घूमजाव करावे लागले. रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आम्हाला तेथे सत्तांतर नको असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले.

युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चांगलाच समाचार घेतला होता. पोलंडच्या सीमेपासून अवघ्या चाळीस मैल अंतरावर असलेल्या युक्रेनवर रशियाचे रॉकेट आदळत असतानाच बायडेन यांनी येथे ऐतिहासिक भाषण दिले होते. पुतीन यांना आणखी काही काळ सत्तेत राहू देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते.युक्रेनमधील संघर्ष हे रशियाचे मोठे रणनितीक अपयश असून सर्वसामान्य रशियन हे मात्र आमचे शत्रू नसल्याचे बायडेन म्हणाले होते.

सध्या नाटोच्या ताब्यात असलेल्या भूभागावर रशियाने इंचभर देखील अतिक्रमण करता कामा नये असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता. बायडेन यांनी त्यांच्या भाषणामध्ये उदारमतवादी लोकशाहीच्या संरक्षणाचा उल्लेख करतानाच नाटो आणि युरोपीय देशांनी या रशियन आक्रमणाविरोधात दीर्घकालीन लढाईची तयारी ठेवावी असे म्हटले आहे. तत्पूर्वी बायडेन यांनी शनिवारी युक्रेनमधील निर्वासितांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या होत्या. बायडेन यांच्या भाषणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटू लागले असतानाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅंटोनी ब्लिंकन यांनी आम्हाला रशियामध्ये सत्तांतर घडवून आणायचे नसल्याचे नमूद केले.

आण्विक संशोधन केंद्र लक्ष्य

किव्ह : खारकिव्हला लागून असलेल्या आण्विक संशोधन केंद्रावर रशियाने पुन्हा बॉम्बगोळ्याचा मारा केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या ताज्या हल्ल्यामध्ये प्रकल्पाचे नेमके किती नुकसान झाले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. याआधीही या केंद्रावर हल्ला करण्यात आला होता. या ताज्या हल्ल्यानंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

लव्हिववर क्षेपणास्त्रांचा मारा

युद्धग्रस्त भागातून नागरिकांची सुटका करण्यासाठी दोन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्यावर युक्रेन आणि रशियामध्ये आज मतैक्य झाले. मारिऊपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांना कारमध्ये बसून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे उपपंतप्रधान इरिना व्हेरेश्चूक यांनी सांगितले. युक्रेनमधील लव्हिव शहरावर आज रशियाकडून पुन्हा क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी युरोपीय देशांकडे आणखी मदतीची मागणी केली आहे. अमेरिकेने युक्रेनला दहा कोटी डॉलरचा निधी नव्याने देण्याची तयारी दर्शविली आहे.

आपत्तीचा सामना करण्यासाठी आराखडा हवा

‘युनेस्को’च्या अहवालात शिक्षण पद्धतीच्या बदलांवर बोट

नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्षाने अशी आपत्ती केव्हाही ओढवू शकते हे दाखवून दिले असून सर्वच देशांतील शिक्षण व्यवस्थांनी अशा प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी एक वेगळा आराखडा तयार ठेवणे गरजेचे असल्याचे मत ‘युनेस्को’च्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टमध्ये मांडण्यात आले आहे. शिक्षकांनी आता अधिक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अध्यापन करण्याची सवय लावून घ्यावी. अनेकदा अशा स्थितीमध्ये शिक्षणसंस्थांच्या इमारती उद्‍ध्वस्त होतात तर वर्गांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असू शकतात. शिक्षणशास्त्राच्या पारंपरिक चौकटीमधून आपल्याला आता विचार करता येणार नाही, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. युक्रेनसारखा संघर्ष किंवा कोरोना संसर्गाची स्थिती जगामध्ये कोठेही निर्माण होऊ शकते. शिवाय वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे ओढवणाऱ्या आपत्ती देखील आहेत. या सगळ्यांचा शिक्षण प्रक्रियेतील सातत्य आणि गुणवत्तेला मोठा धोका असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

निर्वासितांचा प्रश्न

संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या संघटनेने मागील वर्षी तयार केलेल्या अहवालामध्ये जगाचा विचार केला तर ८ कोटी ४० लाख लोकांवर निर्वासितांचे जीवन जगण्याचे वेळ आली असल्याचे म्हटले आहे. यंदा हीच निर्वासितांची संख्या आणखी वाढू शकते. युक्रेनमधील दहा लाखांवर मुलांच्या नशिबी निर्वासितांचे जिणं आले असल्याचे याआधीच संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर करण्यात आले आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • रशियाकडून युक्रेनमधील इंधन,अन्नधान्यांच्या साठ्यांवर हल्ले

  • लव्हिव शहरावर रशियाकडून रॉकेट हल्ले सुरूच

  • चेर्नोबिल कामगारांचे शहर रशियन सैन्याच्या ताब्यामध्ये

  • खारकिव्ह आण्विक संशोधन केंद्रांवर तोफगोळ्यांचा मारा

  • रशियन जनरल याकोव्ह युक्रेनमध्ये ठार झाल्याची शक्यता

  • युक्रेनच्या अध्यक्षांनी युरोपीय देशांकडे मागितली लष्करी मदत

  • रशियन अब्जाधीशांची दोन विमाने ब्रिटन सरकारकडून जप्त

रशियाने युक्रेनचे इंधन, अन्नधान्यांची गोदामे यांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. आम्हाला आता हे सगळे काही लपवून ठेवावे लागणार आहे.

- व्हॅदेम देनयेसेन्को, अंतर्गत व्यवहारमंत्री युक्रेन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()