शरणागतीस युक्रेनचा नकार; किव्ह आणि खारकिव्हमध्ये हवाई हल्ले सुरुच

रशियाकडून विविध शहरांमध्ये तोफगोळ्यांचा मारा सुरुच
russia ukraine war crisis Ukraine refusal to surrender Kyiv and Kharkiv air strikes
russia ukraine war crisis Ukraine refusal to surrender Kyiv and Kharkiv air strikes sakal
Updated on

लव्हिव : वेढा घातलेल्या मारीउपोलमध्ये शस्त्रे खाली ठेवा आणि पांढरे निशाण फडकावून शरणागती पत्करा, असा रशियाने दिलेला इशारा युक्रेन सरकारने साफ धुडकावून लावला आहे. शरणागतीबाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. रशियानेही किव्ह आणि खारकिव्ह या शहरांसह युक्रेनच्या सर्व भागांमध्ये हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत.

मारिउपोलला रशियाने गेल्या तीन आठवड्यांपासून वेढा घातला आहे. तरीही हे शहर अद्याप रशियाच्या ताब्यात आले नाही. रशियाने काल रात्री या शहरातील नागरिकांना शहर सोडून जाण्यासाठी दोन ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच, युक्रेनी सैन्यानेही शरणागती पत्करण्याचे आवाहन केले होते. मात्र, युक्रेनने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला.

रशियाचे हल्ले सुरुच

मारीउपोलमध्ये रशियाने काल (ता. २०) एका शाळेवर बाँबफेक केली होती. यावेळी शाळेत चारशे नागरिक आश्रयाला होते. शाळेची इमारत पडल्यानंतर ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. युक्रेन सरकारने या हल्ल्यातील जीवित हानीबाबत अधिकृत माहिती अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही.

युद्धभूमीवरील घडामोडी

  • पोदील जिल्ह्यात तोफगोळ्यांच्या माऱ्यात सहा नागरिकांचा मृत्यू

  • सुमी शहरावरील रसायन प्रकल्पावर हल्ला

  • रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ९०२ सामान्य नागरिकांचा मृत्यू

  • ३४ लाख जणांचे शेजारील देशांमध्ये स्थलांतर

रशियन लोकांचेही पलायन

मॉस्को : युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याला रशियातूनही विरोध होत असून अनेक नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. आंदोलकांना विविध गुन्ह्यांखाली अटक होत असल्याने अनेक जण रशियातून बाहेर पळून जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियन पोलिसांनी आतापर्यंत हजारो आंदोलकांना अटक केली असून माध्यम स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लागू केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.