डेव्हिड बेकहॅमनं जिंकली मनं! युक्रेनियन डॉक्टरला चालवायला दिलं इंस्टाग्राम

russia ukraine War david beckham hands over instagram account to Ukrainian doctor in kharkiv
russia ukraine War david beckham hands over instagram account to Ukrainian doctor in kharkiv
Updated on

सध्या सगळ्या जगाचे लक्ष रसिया युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरु असलेल्या युध्दाकडे लागले आहे. या युध्दात जगभरातून युक्रेनला पाठिंबा दिला जात आहे. यादरम्यान दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम (David Beckham) ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट एक दिवसाठी खारकीव्ह मध्ये काम करणाऱ्या युक्रेनियन डॉक्टरला दिला. ज्यामुळे त्याच्या लाखो फॉलोअर्सना सध्या युक्रेनमधील परिस्थिती पाहाता आली.

सध्या युक्रेनमध्ये वाईट परिस्थिती असून शेकडो लोक ठार झाले आहेत तर हजारोंनी पलायन केलं आहे. या संकटाच्या काळात जगभरातून युक्रेनला वेगवेगळ्या मार्गांनी मगत केली जात आहे. यादरम्यान डेव्हिड बेकहॅमच्या या निर्णयामुळे त्याच्या Instagram स्टोरीजनध्ये चाइल्ड ऍनेस्थेसियोलॉजिस्ट आणि प्रादेशिक पेरिनेटल सेंटरच्या अध्यक्षा इरिना यांनी रविवारी अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले. त्यांनी सध्या डॉक्टर-नर्सेस कोणत्या परिस्थितीच युक्रेनमध्ये काम करत आहेत ते सगळ्या जगाला दाखवलं.

इरिना यांनी बेकहॅमच्या 71.5 मिलीयन फॉलोअर्सना ते तळघर दाखवलं जेथे रशियन हल्ल्याच्या पहिल्या दिवशी सर्व गर्भवती महिला आणि नुकतेच आई झालेल्या मातांना ठेवण्यात आलम होते. यासोबतच इरीना यांनी आयसीयूमध्ये नवजात मुलाचे फोटो पोस्ट केले. एका क्लिपमध्ये, इरीना यांनी याना नावाच्या नुकतेच आई झालेल्या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात ती मायखायलो या तीच्या बाळाला घेतलेली दिसत आहे.

russia ukraine War david beckham hands over instagram account to Ukrainian doctor in kharkiv
5 मिनिटात चार्ज होईल Ola Electric स्कूटर; इस्रायली कंपनीशी केला करार!

इरिना यांनी या व्हिडीओत सांगितले की, त्या सध्या 24/7 काम करत आहेत, पुढे त्यांनी सांगितले 'आम्ही आमचा जीव धोक्यात घातला असेल, पण आम्ही त्याचा अजिबात विचार करत नाही. आम्हाला आमचे काम आवडते. डॉक्टर आणि परिचारिका येथे रडत आहेत, काळजीत आहेत, परंतु आपल्यापैकी कोणीही धैर्य गमावले नाही. 2005 पासून, युनिसेफ अम्बेसीडर असलेल्या बेकहॅमने यांने त्याच्या फॉलोवर्सना युक्रेनसाठी मदत करण्याचे आवाहन देखील केले आहे. बेकहॅम यांनी एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत त्यांच्या फॉलोवर्सना युक्रेनमधील संस्थेच्या कार्यास पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

russia ukraine War david beckham hands over instagram account to Ukrainian doctor in kharkiv
एअरटेलचा 28 दिवसांचा प्लॅन; दररोज 2.5GB डेटासह मिळेल अजून बरंच काही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.