Russia-Ukraine War: रशियात क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, कुटुंबीय मृतदेहाशिवाय करणार अंत्यसंस्कार; मोदी सरकारकडे केली 'ही' मागणी

Russia-Ukraine War: हेमिल यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हमील हा सुरतमधील पाटीदार वराछा येथील आनंदनगर वाडीचा रहिवासी होता.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarEsakal
Updated on

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. 21 फेब्रुवारी रोजी क्षेपणास्त्र हल्ल्यात गुजरातमधील 23 वर्षीय हेमिल मांगुकियाचा मृत्यू झाला होता. हेमिल यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हेमिल हा सुरतमधील पाटीदार वराछा येथील आनंदनगर वाडीचा रहिवासी होता.

हेमिलचे वडील अश्विन मंगुकिया एम्ब्रॉयडरी युनिटमध्ये काम करतात आणि ते खूप दु:खी झाले आहेत. अश्विन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्ही आमच्या सरकारला नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी रशियन अधिकाऱ्यांशी बोलून माझ्या मुलाचा मृतदेह त्याच्या मूळ गावी सुरत येथे आणावा. 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्याचे शरीर कोठे आहे हे देखील आम्हाला माहित नाही किंवा आम्ही तिथे कोणाच्याही संपर्कात नाही अशा इतर कोणाचे संपर्कही नाहीत. आम्ही असाहाय्य आहोत.”

अश्विन यांनी सांगितले की, हेमिल त्याच्याशी २० फेब्रुवारीला शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारीला हॅमिलचा मृत्यू झाला. हेमिलने आपल्या वडिलांना सांगितले की, तो ठीक आहे परंतु त्याने आपली नोकरी उघड केली नाही. कुटुंबाला फक्त हे माहित होते की, तो रशियामध्ये मदतनीस म्हणून काम करतो. त्यांना नंतर कळले की हेमिलला युक्रेनच्या सीमेवरील युद्धक्षेत्रात पाठवण्यात आले होते.

Russia-Ukraine War
Attack on Burkina Faso Church: बुर्किना फासोमध्ये कॅथोलिक चर्चवर दहशतवादी हल्ला, 15 लोक ठार, दोन जखमी

अश्विन यांनी पुढे सांगितले की, आपल्याला 23 फेब्रुवारीला हेमिलच्या मृत्यूची बातमी मिळाली. “हैदराबादचा रहिवासी असलेल्या इम्रानने शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) संध्याकाळी ६ वाजता आम्हाला फोन केला आणि त्याच्या मृत्यूची माहिती दिली. युद्धक्षेत्रात क्षेपणास्त्र हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. इमरानचा भाऊ हेमिलसोबत होता. त्याने आम्हाला या घटनेबद्दल सांगितले आणि आम्ही पूर्णपणे हादरलो. 20 फेब्रुवारीच्या रात्री आम्ही हेमिलशी बोललो आणि तो पूर्णपणे बरा होता. जेव्हा आम्ही त्याला विचारले की तो कोणत्या प्रकारचे काम करत आहे, तेव्हा त्याने आम्हाला जास्त सांगितले नाही.”

Russia-Ukraine War
Expulsion: इमामने राष्ट्रीय झेंड्यांचा अपमान केला; थेट देशातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण?

इंडियन एक्स्प्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार हेमिलने 12वी नंतर शाळा सोडली आणि त्याच्या चुलत भावांसोबत एक छोटासा भरतकामाचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, हेमिलनंतर रशियामध्ये हेल्परच्या नोकऱ्या देणाऱ्या वेबसाइटद्वारे एजंटच्या संपर्कात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.