गेल्या तीन दिवसांपासून रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेन धुमसत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेन धुमसत आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी किवमध्ये शुक्रवारी हल्ला केला. सरकारी क्वार्टरजवळ गोळीबार आणि स्फोटांचे धमाके झाले. या संघर्षात शेकडो सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रशियाच्या या आक्रमणामुळे युरोपात मोठ्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच रशियाला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती जप्त होऊ शकते. युरोपीय संघाने याबाबतचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाचं बुचारेस्ट इथून उड्डाण झालं आहे. हे विमान रविवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. या विमानातून २५० नागरिक मायदेशी परतणार आहे.
युक्रेनमधून 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईतमध्ये दाखल झाले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानात जाऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद
युक्रेनमधून 219 विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल
युक्रेनची राजधानी किवपासून रशियन सैन्य अवघ्या काही अंतरावर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.
युक्रेनच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागांमधील इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील भागात रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे येथील इंटरनेट सेवांवर याचा परिणाम झाला आहे, असे रॉयटर्सने नेटब्लॉक्सच्या हवाल्याने सांगितले आहे.
आम्ही कीव आणि शहराच्या आसपासच्या प्रमुख ठिकाणांवर नियंत्रण ठेवत असून, ज्यांना आम्हाला मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे यावे. या सर्वांना शस्त्रे पुरवली जातील. हे युद्ध आपल्याला थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी नागरिकांना केले आहे.
रशियाने केलेल्या हल्ल्यात 198 लोक ठार झाले असून, हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले आहे, अशी माहिती युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय नागरिकांना घेऊन पहिल्या विमानाने रोमानियाहून उड्डाण केले आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धानंतर जगाने दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे असा इशारा फ्रान्सने दिला आहे.
युरोपियन संघाच्या अध्यक्षांसोबत चर्चा झाली असून त्यांनीही मदतीचे आश्वासन दिले असल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दिली. दरम्यान, जगाने आपल्याला एकटं सोडलं असल्याची भावना व्यक्त केलेल्या झेलेन्स्की यांनी ट्विटरवरून सर्वांना अनफॉलो केलं आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धात हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतीचा फोटो शेअर करत रशियाला जगाने एकटं पाडावं असं आवाहन केलं आहे.
रशियाने आता युक्रेनमधील मेलीटोपोल शहर ताब्यात घेतलं आहे. रशियन सैनिक शहरात घुसल्याची माहिती रशियाच्यावतीने देण्यात आली आहे.
युक्रेन संकटावर भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी म्हटलं की, हे युद्ध पुतीन यांचे आहे. ही शरमेची बाब आहे की असं होत आहे. आम्ही आर्थिक निर्बंध घालून याला उत्तर देऊ. आम्ही दुसऱ्या देशावर ताबा घेण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. आम्हाला असा आंतरराष्ट्रीय गट हवा आहे जो आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारीत असेल.
युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांनी म्हटलं की, मला शस्त्र हवी आहेत, मी पळून जाणार नाही. याआधी युक्रेनला स्वीडननेसुद्धा मदतीची ऑफर दिली होती. जगाने त्यांना युद्ध लढण्यासाठी एकटं सोडल्याचं भावनिक ट्विटही झेलेन्स्की यांनी केलं होतं.
युक्रेनमधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी अॅडवायजरी जारी केली आहे. अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याशिवाय सीमेवर विद्यार्थ्यांनी जाऊ नये असं आवाहन दुतावासाने युक्रेनमधील भारतीयांना केलं आहे.
रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अनेक परदेशी नागरिक अडकले आहेत. यात भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचं एक विमान शनिवारी सकाळी मुंबईतून रोमानियाकडे रवाना झालं.
युक्रेनच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना रशियासोबत चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून काम करण्याचं आवाहन केलं आहे.
रशियासोबत चर्चेसाठी युक्रेन तयार झाले आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रशियासोबत चर्चेला तयार असून दोन्ही देश चर्चेच्या स्वरुपावर विचार करत आहेत. युक्रेनने वारसॉमध्ये चर्चेसाठी बैठक आय़ोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रशियाने मिन्स्कमध्ये चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.