Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियन सैन्याने अनेक शहरांना वेढा घातला असून खेरसनसह अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारी रशियाने झापोरिझिया येथील अणु प्रकल्पावरही हल्ला केला. आता त्यावर रशियाचे नियंत्रण आहे. येथूनच युक्रेनला मोठ्या प्रमाणात ऊर्जा पुरवठा होत असे. या हल्ल्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले.
दुसरीकडे, रशियाच्या विरोधात तपास करण्यासाठी स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेवर मत जाणून घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत मतदान घेण्यात आले, ज्यामध्ये भारत आणि चीनने स्वतःला मतदानापासून दूर ठेवले. याआधीही भारताने याबाबत मतदान केलेले नव्हते. त्याच वेळी, रशियाने कथित 'फेक न्यूज' संदर्भात एक नवीन कायदा लागू केला. त्यानंतर फेसबुक आणि ट्विटरवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच सीएनएन, बीबीसी यांनाही वृत्तांकन थांबवावे लागले आहे. आज शनिवार दिवसभरात काय काय घडतंय, त्या सगळ्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा फक्त 'सकाळ'वर… (Russia-Ukraine crisis Live)
विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा आणि अनावश्यक जोखीम टाळण्याचा सल्ला देण्यात आला असून मंत्रालय आणि दूतावास विद्यार्थ्यांच्या नियमित संपर्कात आहेत. युक्रेनमधील सुमी (Sumy) येथील भारतीय विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला खूप काळजी आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार व्हावा यासाठी तात्काळ युद्धबंदीसाठी अनेक माध्यमांद्वारे रशियन आणि युक्रेनियन सरकारांवर जोरदार दबाव आणला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.5) संध्याकाळी पुन्हा एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन गंगा मोहिमेचा आढावा घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती गंभीर झाली असून, अनेक भारतीय नागरिक अजूनही युद्धग्रस्त भागात अडकले आहेत.
#WATCH | PM Modi chairs a high-level meeting on the #Ukraine issue. pic.twitter.com/o80S9rcBI4
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनच्या खारकिव्ह शहरामधून जवळपास सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे.
लगभग सभी भारतीय यूक्रेन के खार्किव शहर से निकाले जा चुके हैं, जो एक अच्छी ख़बर है: विदेश मंत्रालय के प्रवक्ता अरिंदम बागची pic.twitter.com/CjiBa2xL6q
— ANI_HindiNews (@AHindinews) March 5, 2022
रशियाची एरोफ्लॉट एअरलाइन आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करणार
रशियाच्या मॉस्को टाईम्सच्या वृत्तानुसार, रशियन एरोफ्लॉटने 8 मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्याची घोषणा केली आहे. एरोफ्लॉट ही रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या 6, 222 भारतीय विद्यार्थ्य़ांना गेल्या अठवडाभरात ऑपरेशन गंगातंर्गत रोमानिया आणि मोल्दोव्हाधून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती हवाई उड्डणा मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे.
Update on #OperationGanga in Romania & Moldova:
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 5, 2022
- Evacuated 6222 Indians in the last 7 days
- Got a new airport to operate flights in Suceava (50 km from border) instead of transporting students to Bucharest (500 km from border)
- 1050 students to be sent home in the next 2 days
We are deeply concerned about Indian students in Sumy, Ukraine. Have strongly pressed Russian and Ukrainian governments through multiple channels for an immediate ceasefire to create a safe corridor for our students: Arindam Bagchi, MEA Spokesperson stated in a tweet
— ANI (@ANI) March 5, 2022
(file pic) pic.twitter.com/Q7GmKyMBH4
शनिवारी युक्रेनच्या चेर्निहाइव्हमध्ये शक्तिशाली स्फोट झाला.
At night there was a powerful explosion near #Chernihiv. pic.twitter.com/6bcRVJoQFz
— NEXTA (@nexta_tv) March 5, 2022
युक्रेनमधील भारताच्या दूतावासाने दिलेल्या माहितीनुसरा, त्यांनी खारकीव्हमधील पिसोचिन येथून 298 भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे.
The embassy of India in Ukraine says they arranged buses to evacuate 298 Indian students from Pisochyn, in Kharkiv pic.twitter.com/YxvTMyRak9
— ANI (@ANI) March 5, 2022
66,224 युक्रेनियन पुरुष रशियाच्या आक्रमणाविरूद्धच्या लढाईत सामील होण्यासाठी परदेशातून युक्रेनमध्ये परतले असल्याची माहिती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह म्हणाले.
Ukrainian Defence Minister Oleksii Reznikov said that 66,224 Ukrainian men had returned from abroad to join the fight against Russia's invasion: Reuters
— ANI (@ANI) March 5, 2022
रशियाने युक्रेनच्या मारियुपोल (Mariupol) आणि व्होल्नोवाखा ( Volnovakha) येथे मानवतावादी कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्पुरती युद्धविराम घोषित केला आहे. हा कॉरिडॉर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि जगापासून संपर्क तुटलेल्या शहरांमध्ये अन्न आणि औषध वितरीत करण्यासाठी असणार आहे.
रशियाने नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी 07:00* GMT (ग्रीनविच मीन टाइम झोन) पासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला गेला आहे, असे रशियाचे मीडिया आउटलेट स्पुतनिकने सांगितले आहे.
Temporary ceasefire begins in Mariupol and Volnovakha to set up humanitarian corridors. The corridors will serve to evacuate civilians & deliver food & medicine to the cities that have been cut off from the world...: Ukraine's The Kyiv Independent
— ANI (@ANI) March 5, 2022
रशिया भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यास तयारी दाखवली असून, रशियाच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, रशिया युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यास तयार आहे.
Russia declares ceasefire in Ukraine from 06:00 GMT (Greenwich Mean Time Zone) to open humanitarian corridors for civilians, reports Russia's media outlet Sputnik
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनमध्ये गोळीबारात मरण पावलेला एमबीबीएस विद्यार्थी नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa) यांचा मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू असून आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, याप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही बोललो असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
Efforts to bring back Naveen Shekharappa's (an MBBS student who died in shelling in Ukraine) body is in progress. We're in touch with the Indian embassy, also spoke to External Affairs Minister, S Jaishankar on the matter: Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/zpxNzd383h
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनची राजधानी किव्ह शहराजवळ रशियन सैन्याने नागरिकांच्या कारवर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे, या गोळीबारात 2 जण ठार झाले आहेत.
रशियन सैन्याने युक्रेनच्या इरपिन (Irpin) शहरातील लष्करी एका लष्करी रुग्णालयावर बॉम्ब टाकला.
युक्रेनमधून भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत आणले जात आहे या दरम्यान नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) कोरोना 19 आणि युद्धासारख्या परिस्थितीमुळे इंटर्नशिप अपूर्ण असलेल्या परदेशी वैद्यकीय पदवीधरांना त्यांनी FMGE पास केल्यास भारतात पूर्ण इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे.
Amid the ongoing evacuation of Indian medical students from #Ukraine, National Medical Commission (NMC) allows Foreign Medical Graduates with incomplete internships due to compelling situations like the Covid19 & war...to apply to complete internships in India if they clear FMGE pic.twitter.com/tqxeCNPdYy
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनची राजधानी किव्ह शहरावर हवाई हल्लयाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना आसरा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे - किव्ह इंडिपेंडट, युक्रेन
Air raid alert in Kyiv. Residents should go to the nearest shelter: Ukraine's The Kyiv Independent#RussianUkrainianCrisis
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेन सीमेवरून रशियन गुप्तहेरला अटक
युक्रेनच्या सीमेवरून एका रशियन हेराला अटक करण्यात आली आहे. तो काही गुप्त ऑपरेशन चालवत होता, असे सांगितले जात आहे. तो स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत होता. युक्रेनमध्ये त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो
युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू झाल्यापासून रशियाने आठवड्यात 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशिया दररोज सुमारे दोन डझन या वेगाने विविध प्रकारची क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करत आहे, अशी माहिती पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने दिली: द किव्ह इंडिपेंडट, युक्रेन
Russia has fired more than 500 missiles in the week since its full-scale invasion of Ukraine began. Russia is launching all different types of missiles at a rate of about two dozen per day, a Pentagon official said: Ukraine's The Kyiv Independent#RussianUkrainianCrisis
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियन लष्करी कारवायांमध्ये, युक्रेनमधून आतापर्यंत 11,000 हून अधिक भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी शनिवारी दिली आहे. ऑपरेशन गंगा मोहिमेत युक्रेनमधून बाहेर काढलेल्या 170 भारतीय नागरिकांचे त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले .
#RussiaUkraine | MoS MEA V. Muraleedharan tweets, "11,000 Indians evacuated from Ukraine so far. Happy to have received a group of 170 Indians at New Delhi airport, evacuated through AirAsia India."#OperationGanga pic.twitter.com/nQoHroUnK8
— ANI (@ANI) March 5, 2022
युक्रेनियन बंदर शहर मारियुपोलच्या महापौरांनी म्हटले आहे की, रशियन सैन्याने शहराची 'नाकेबंदी' केली आहे. हे युद्ध दुसर्या आठवड्यात प्रवेश करत असताना, मॉस्कोचे खेरसनवर नियंत्रण होते आणि आता इतर प्रमुख शहरांवर लष्करी आक्रमण वाढत आहे.
द किव्ह इंडिपेंडंटने दिलेल्या रिपोर्टनुसार खारकिव्हमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. यादरम्यान सर्व रहिवाशांना जवळच्या आश्रयाच्या ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे.
ऑपरेशनगंगा या मोहिमेअंतर्गत युक्रेनमधील 229 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष इंडिगो विमान रोमानियातील Suceava येथून दिल्लीत पोहोचले
#RussiaUkraine | MoS MEA V. Muraleedharan tweets, "11,000 Indians evacuated from Ukraine so far. Happy to have received a group of 170 Indians at New Delhi airport, evacuated through AirAsia India."#OperationGanga pic.twitter.com/nQoHroUnK8
— ANI (@ANI) March 5, 2022
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.