Russo-Ukrainian War: रशियावर 9/11 सारखा हल्ला! हल्ले-प्रतिहल्ले सुरूच; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Russo-Ukrainian War: रशियावर 9/11 सारखा हल्ला! हल्ले-प्रतिहल्ले सुरूच; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Updated on

किव्ह: गेल्या अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असून सोमवारी सकाळी रशियाच्या सारातोव्ह येथे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखा हल्ला झाला. एक ड्रोन सकाळी ३८ मजली इमारत ‘व्होल्गा स्काय’ला धडकले. यात चार जण जखमी झाले. या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा आरोप रशियाने केला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून रशियाने युक्रेनचे किव्ह, खारर्किव्ह, ओडेसा, लीवसह १२ शहरांवर शंभराहून अधिक क्षेपणास्त्र डागली.

युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या इमारतीचा मोठा भाग ढासळला आहे. त्यामुळे इमारतीखाली असलेल्या वीसपेक्षा अधिक गाड्यांची नासधूस झाली आहे. यात एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. सारातोव्ह हे युक्रेनच्या सीमेपासून ९०० किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यानंतर सर्वप्रकारचे हवाई मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Russo-Ukrainian War: रशियावर 9/11 सारखा हल्ला! हल्ले-प्रतिहल्ले सुरूच; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
IPL 2025 Auction: KL Rahul लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडणार? अचानक घेतली मालक संजीव गोएंका यांची भेट

सोमवारी युक्रेनने रशियावर वीस ड्रोन हल्ले केले. यात सर्वाधिक सारातेव्ह येथे नऊ हल्ले झाले. मास्कोचे गर्व्हनर यांनी हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे. युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रत्युत्तर देताना रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. युक्रेनच्या द किव्ह इंडिपेंडेटने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी किव्ह आणि युक्रेनच्या अन्य शहरात सकाळी प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली गेली असून ती संख्या शंभरावर राहू शकते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ड्रोन हल्ले झाल्याने ठिकाठिकाणी स्फोट झाले आहे.

परिणामी सकाळी सहाच्या अगोदरच देशभरात हवाई हल्ल्यांनंतर भोग्यांचे आवाज ऐकू लागले. युक्रेनच्या मते, किव्हवरील हल्ला करताना ११ टीयू-९५ स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स, किंझल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. यात अपार्टमेंटची पडझड झाली आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे हल्ले युक्रेन-पोलंडच्या सीमेजवळ झाले आहेत. यानंतर पोलंडने म्हटले, युक्रेनवरील हल्ल्यानंतर पोलंड आणि त्यांच्या नाटो देशांना लढाऊ विमाने सज्ज राहण्याची सूचना दिली आहे.

युक्रेनमधील शहरांत सकाळी स्फोटकांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर काही मिनिटांतच स्फोटकांची मालिका सुरू झाली. किव्हचे महापौर इओर तेरेखोव्ह यांनी खारकिव्ह येथेही स्फोट झाल्याचे सांगितले. किव्ह व्यतिरिक्त डेसा, विन्नित्सिया, झापोरेझ्झिया, क्रेमेनचूक, दिनिप्रो, खमेलनित्स्की, क्रोपव्हिनत्स्की, क्रिव्ही रिह येथेही हल्ले झाले आहेत.

Russo-Ukrainian War: रशियावर 9/11 सारखा हल्ला! हल्ले-प्रतिहल्ले सुरूच; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
India's Schedule T20 WC 2024: भारत-पाकिस्तान महामुकाबला ६ ऑक्टोबरला; टीम इंडियाचं वेळापत्रक आलं समोर

रशियाच्या सुमारे सहा विमानांनी शहरावर बॉम्बफेक केल्याचे आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. शिवाय कमिकेज ड्रोनच्या हालचाली होणार असल्याची माहिती युक्रेनला मिळाली होती आणि त्यानंतर ड्रोनचे हल्ले झाले. प्रारंभी रशियाकडून अकरा विमाने येणार असल्याची बातमी कळाली होती. मात्र सहा विमानांनी हल्ले केले. रशियाच्या हवाई दलाने क्षेपणास्त्र डागताना सरकारी इमारती आणि चौकांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.