रशिया रासायनिक हल्ला करु शकतो; नाटो प्रमुखांनी सांगितलं कारण

Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine
Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine Sakal
Updated on

रशिया युक्रेम याच्यात मागील काही दिवसांपासून युध्द सुरू आहे. यातच रशिया युक्रेन वर रासायनिक शस्त्रांबाबत आरोप करत आहे. यादरम्यान युक्रेनवर आक्रमणात रशिया रासायनिक शस्त्रे वापरण्यासाठी खोटी कारणे शोधत असून रशिया युक्रेनवर रासायनिक शस्त्रे वापरू शकतो अशी भीती नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग (Jens Stoltenberg) यांनी व्यक्त केली आहे.

युक्रेनमध्ये रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रांबद्दलचे रशियाचे दावे मूर्खपणाचे आहेत आणि ते रशिया स्वतः रासायनिक हल्ला करण्यासाठी किंवा तशा हल्ल्यांना योग्य ठरवण्यासाठी ते कारण म्हणून वापरु शकतो, वेल्ट अॅम सोनटॅग (Welt am Sonntag) या जर्मन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नाटो प्रमुखांनी सांगितले.

ते म्हणाले. 'अलीकडच्या काही दिवसांत, आम्ही रासायनिक आणि जैविक शस्त्रे प्रयोगशाळांबद्दल मूर्खपणाचे दावे ऐकत आहेत, आता हे खोटे दावे केले गेले आहेत, त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे, कारण शक्य आहे की, रशिया स्वतःच या खोटेपणाच्या आडून रासायनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्याची योजना आखू शकतो. हा एक युद्ध गुन्हा असेल', असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणादरम्यान येत्या काही दिवसांत युक्रेनियन लोकांना अधिक त्रास सहन करावा लागेल, असा अंदाज नाटो प्रमुखांनी व्यक्त केला.

Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine
'नाटो अन् रशिया भिडले तर…'; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा गंभीर इशारा

शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत, रशियाने अमेरिका-युक्रेन यांच्यावर रासायनिक शस्त्रांबाबत आरोप केले आहेत. रशियन राजदूत वसिली नेबेन्झिया म्हणाले की, त्यांच्या संरक्षण मंत्रालयाकडे अशी कागदपत्रे आहेत की, युक्रेनमध्ये कमीतकमी 30 जैविक प्रयोगशाळा आहेत ज्या अत्यंत धोकादायक जैविक प्रयोग करत आहेत. त्यांनी असा दावा केला की, हे प्रयोग युनायटेड स्टेट्सच्या डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सीद्वारे त्यांना आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य पुरवले जात आहे.

तर युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक शस्त्र वापराबाबत संभाव्य खोटी माहिती पसरवण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या बैठकीचा वापर केल्याचा आरोप अमेरिकेने रशियावर केला आहे. यूएस राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी सांगितले की, या खोट्या गोष्टींमागील हेतू स्पष्ट दिसत आहे आणि तो खूप त्रासदायक आहे. रशिया खोट्या घटनेचा भाग म्हणून किंवा लष्करी ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा वापर हत्येसाठी करू शकतो. असे देखील त्यांनी सांगितलं.

Russia-Ukraine War nato chief says russia may use chemical weapons on Ukraine
बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.