युक्रेनविरोधात रशियाचा नवा डाव; लढण्यासाठी सिरियन सैनिकांना देणार 300 डॉलर

Russia Ukraine war now Russia recruiting Syrian fighters to capture Kyiv offering 300 reports
Russia Ukraine war now Russia recruiting Syrian fighters to capture Kyiv offering 300 reports Sakal
Updated on

रशिया-युक्रेन युध्द (Russia Ukraine war) मागच्या 12 दिवसांपासून सुरु आहे. यादरम्यान युक्रेनविरुद्धच्या हल्ल्यात रशियाकडून आता सीरियन सैन्याचा (Syrian fighters) देखील समावेश करण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता युक्रेनची राजधानी किव्ह शहरावर ताबा मिळवण्यासाठी सीरियन सैनिकांची मदत घेत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकन अधिकार्‍यांचा हवाला देत दिलेल्याल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, काही सीरियन सैनिक आधीच रशियाकडून आक्रमण करण्याची तयारी करत आहेत, तर बरेचजण त्या वाटेवर आहेत.

रशियन आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये 12 दिवसांपासून युध्द सुरू आहे. त्याच वेळी, रशिया 2015 पासून सीरियामध्ये गृहयुद्ध लढण्यासाठी सीरिया सरकारला मदत करत आहे. रिपोर्टमध्ये चार अमेरिकन अधिकार्‍यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, रशियाला आता आशा आहे की, शहरी भागातील लढाईतील सीरियन लोकांचे कौशल्य किव्ह हे शहर ताब्यात घेण्यासाठी मदतीचे ठरु शकते. दरम्यान रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनमधील संघर्ष आणखी वाढविण्याची शक्याता असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Russia Ukraine war now Russia recruiting Syrian fighters to capture Kyiv offering 300 reports
युक्रेनमध्ये ऐन युध्दात 61000 हून जास्त Airbnb चं बुकिंग; कारण आहे खास

सीरियन सैनिकांना 200 ते 300 डॉलर्सची ऑफर

रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "युक्रेनमध्ये सीरियन सैनिकांच्या तैनाती, स्थिती किंवा प्रयत्नांबद्दल आणखी काय माहिती आहे हे अधिका-यांनी स्पष्ट करण्यास नकार दिला." सीरियन मीडियानेही या भरतीचे वृत्त दिले आहे. सीरियातील देइर एझोर येथील एका पब्लिकेशनने सांगितले आहे की, रशियाने देशाच्या स्वयंसेवकांना $200 ते 300 च्या दरम्यान रक्कम देत सहा महिन्यांसाठी युक्रेनला जाऊन गार्ड म्हणून काम करण्याची ऑफर दिली आहे.

Russia Ukraine war now Russia recruiting Syrian fighters to capture Kyiv offering 300 reports
नारायण राणेंच्या अडचणी संपेनात, आता BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस

युक्रेनला मागील 12 दिवसांपासून रशियन हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. तज्ञांच्या मते रशिया अद्याप त्यांची पुर्ण शक्ती वापरत नाहीये. दरम्यान रशियन सैन्याने आपले आक्रमण चालू ठेवले असले तरी रसदविषयक समस्या, कमी मनोधैर्य आणि युक्रेनियन सैन्याकडून होणारा प्रतिकार यामुळे रशियन सैन्यावर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. तसेच रशिया आणखी 1,000 भाडोत्री सैनिक तैनात करेल आणि युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब टाकेल अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचरांनी एका रिपोर्टमध्ये यापूर्वी दिली होती.

Russia Ukraine war now Russia recruiting Syrian fighters to capture Kyiv offering 300 reports
Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.