आमच्याजवळ काहीच तास उरलेत... युक्रेनियन सैन्याने मागितली मदत

रशियन सैन्याशी लढणाऱ्या युक्रेनी सैन्याकडून जगाला मदतीचे आवाहन
Ukraine
Ukraine esakal
Updated on

किव्ह : रशियाने युक्रेनच्या मारियुपोल शहरात हल्ले तीव्र केले आहेत. रशियन सैन्याशी लढणाऱ्या युक्रेनियन सैन्याने जगाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही तास नव्हे तर काही दिवसच उरले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. रशियाने (Russia) चारी बाजूने घेरलेल्या शहरात एक स्टील प्रकल्पाच्या आत लढणाऱ्या सैनिकांना एक नवीन अल्टिमेटम जारी केला आहे. रशियन सैन्याने मारियुपोलमध्ये एक विशाल स्टील प्रकल्पात लपलेल्या युक्रेन (Ukraine) सैनिकांविरुद्ध बुधवारी (ता.२०) नाकेबंदी कडक केली आहे. हा मारियुपोलमध्ये युक्रेनचा शेवटचा गड आहे. आत लपलेल्या एका सैनिकाने व्हिडिओत मदत करण्याची विनंती केली आहे. (Russia Ukraine War Ukrainian Commander Appeals For Help)

Ukraine
चीन लवकरच तैवानवर करु शकतो हल्ला !रशियावर बीजिंगचे लक्ष

आमच्याजवळ कदाचित काही दिवस तासच उरले आहेत, असे सैनिक व्हिडिओत सांगत आहे. बाॅम्ब हल्ल्यांमुळे या बंदर असलेल्या शहरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न फसले आहे. या दरम्यान क्रेमलिनने युद्ध समाप्त करण्यासाठी आपल्या मागण्यांच्या एका पत्रात म्हटले आहे, की देशातून पलायन करणाऱ्या लोकांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे.

Ukraine
Russia - Ukraine War: 9 मे पर्यंत रशिया - युक्रेन युद्ध चालणार...?

जागतिक तणाव वाढल्यावर रशियाने नवीन प्रकारचे आंतरमहाद्विपीय बॅलिस्टिक मिसाईल 'सरमट' च्या पहिल्या यशस्वी परीक्षणाची माहिती दिली. राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन म्हणाले, की ही कोणत्याही मिसाईल सुरक्षा प्रणालीपासून वाचू शकते. तसेच रशियाला धमकी देणाऱ्या लोकांना दोन वेळेस विचार करण्यास भाग पाडेल. रशियाच्या सरकारी आंतराळ संस्थेने या परीक्षणाला नाटोला भेट म्हटले. पेंटागाॅनने याला नियमित परीक्षण सांगितले आणि म्हटले की ते याला धोका मानत नाही. लुहान्स्कचे गव्हर्नर म्हणाले, की रशियन सैन्याने त्यांच्या ८० भागावर आपल्या ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()