युक्रेन युद्धादरम्यान रुशियासमोर वेगळंच संकट उभे ठाकले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील मानल्या जाणाऱ्या 'वॅगनर ग्रुप'ने बंड केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन युद्धादरम्यान वॅगनर ग्रुपचा म्होरक्या येवगनी प्रिगोझिन आणि पुतीन यांच्यातील वाद तापला आहे.
खासगी सैनिकांचा गट असलेल्या वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनम परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वॅगनर ग्रुप लष्करी बळाचा वापर करुन सत्ता उलधवून टाकण्याची पुतीन यांना भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर आता मॉस्कोच्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
रशियाने आपल्याच भाडोत्री सैनिकांवर बंडखोरी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. रशियान सैन्य सध्या युक्रेनचे लष्कर आणि पुतिन यांनी युध्दात लढण्याकरिता बोलवलेल्या या भाडोत्री सैन्याचा सामना करावा लागत आहे.
एबीसी न्यूज रिपोर्टनुसार, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अंतर्गत संघर्षादरम्यान रशियाने वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्यावर सशस्त्र बंडखोरी करण्याचे आवाहन केल्याचा आरोप केला आहे. प्रिगोझन यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे सैनिक युक्रेनमधून रशियाच्या हद्दीत घुसले आहेत आणि रशियन सैन्याविरोधात कोणत्याही मर्यादा गाठण्यास तयार आहेत. यानंतर तणाव शिगेला पोहचाल.
यादरम्यान TASS वृतसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, वॅगनर ग्रुपचा म्होरक्या प्रिगोझिन आणि रशियन सैन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात दिर्घकाळापासून चाललेला संघर्षाने टोक गाठलं आहे . रशियाच्या एफएसबी सुरक्षा सेवेने प्रिगोझिन याच्याविरोधात फौजदारी खटला सुरू केला असून वॅगनर प्रायव्हेट मिलिटरी कंपनी फोर्सेसना येवगेनी प्रिगोझिनच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून त्याला अटक करण्यास सांगितले आहे. क्रेमलिनने प्रीगोझिनवर सशस्त्र बंड पुकारल्याचा आरोप केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले.
दरम्यान सध्या भाड्याचे सैनिक नियंत्रणाबाहेर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून युक्रेन युध्दात वॅगनर ग्रुपचे नाव सतत पुढे येत आहे. ही एक खासगी सैन्य कंपनी आहे. येवगेनी प्रिगोझिन याच्या नेतृत्वखालील या ग्रुप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. बखमुत येथील संघर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात सैनिक गमावले होते.
तसेच प्रिगोझिन यांनी यापूर्वी सोशल मीडियावर युक्रेनच्या अनेक शहरांवर त्यांनी एकट्यानेच ताबा मिळवल्याचा दावा केल्याचा दावा केला आहे. तसेच यामध्ये रशीयन सेनेने त्यांची कुठलीही मदत केली नसल्याचे देखील म्हटले आहे.
तसेच त्यांनी संरक्षण मंत्री सग्रेई शोइगु आणि रशियाचे वरिष्ठ जनरल वालेरी गेरासिमोव अकार्यक्षम असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांच्या सेनेला यांनी शस्त्रास्त्र न पुरवल्याचा देखील म्हटले आहे. तसेच प्रिगोझिनने रशियना नागरिकांना देखील त्याच्या सैन्यात सामिल होण्याचे तसेच रशियन सैन्याचे नेतृत्व करणाऱ्यांना शिक्षा दण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.