'रशियाला त्यांच्या लष्करी शक्तीच्या जोरावर युक्रेनमध्ये सरकार स्थापन करायचं आहे.'
वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये तणावपूर्ण (Russia-Ukraine Conflict) वातावरण निर्माण झालं होतं. यामुळं आंतरराष्ट्रीय घडामोडीही तीव्र होत होत्या. अमेरिका (USA), ब्रिटेन आदी देशांनी रशियाच्या हल्ल्याची शक्यताही वर्तवली होती. शेवटी ज्याची भीती होती ते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झालंय. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानं अमेरिका हैराण झालीय. मात्र, त्यांनी युक्रेनच्या बाजूने लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. परंतु, रशियाला धडा शिकवण्यासाठी अमेरिका विविध प्रकारची तयारी करत असल्याचंही समजतंय. याचेच संकेत खुद्द अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (US Foreign Secretary Antony Blinken) यांनी आज (शुक्रवार, 25 फेब्रुवारी) दिले आहेत. युक्रेन जिंकल्यानंतरही रशियातील रक्तरंजित खेळ असाच दीर्घकाळ चालणार आहे, असा स्पष्ट इशारा ब्लिंकन यांनी रशियाला दिलाय.
रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याचं ठरवलंय. ते म्हणाले, G7 देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास तयार आहेत. यासोबतच आम्ही युक्रेनच्या धाडसी लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आज सकाळी मी माझ्या G7 समकक्षांशी (प्रतिनिधी देश) भेटलो आणि युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अन्यायकारक हल्ल्याबद्दल चर्चा केली. बैठकीत रशियावर आणखी कडक निर्बंध आणि इतर आर्थिक निर्बंध लादण्यावर सहमती झालीय. G-7 हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा एक गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाबाबत अमेरिकेत उच्चस्तरीय बैठकांची मालिका सुरूय. या बैठकीनंतर अँटोनी ब्लिंकन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युद्ध हा काही दिवस किंवा आठवडे चालणारा खेळ नाहीय. तो एक दीर्घकाळ चालणारा खेळ आहे. रशियानं जाणूनबुजून स्वतःला या खेळात अडकवलंय, असं त्यांनी स्पष्ट केलं. रशियाला त्यांच्या लष्करी शक्तीच्या जोरावर युक्रेनमध्ये सरकार स्थापन करायचंय. युक्रेनमधील सध्याचं सरकार हे अमेरिका समर्थक आहे, त्यामुळं रशियानं हे युध्द पुकारलंय. हे सरकार अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी नॉर्थ अटलांटिक मिलिटरी ऑर्गनायझेशनमध्ये (NATO) युक्रेनच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळं संतप्त झालेल्या रशियानं युक्रेनवर हल्ला (Russia Attack Ukraine) केलाय, असंही त्यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिका युक्रेनच्या बाजूनं थेट लढाईत उतरणार नाही, पण ती रशियाला सहजासहजी सोडणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन (US President Joe Biden) यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिलाय. परंतु, रशियाला जे मदत करतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बायडन यांनी दिलाय. तर, दुसरीकडं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी आपल्या भाषणात सांगितलंय की, युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू करण्याचं कारण म्हणजे, शेजारील देशांकडून येणाऱ्या धोक्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. बाहेरुन कुणीही यात हस्तक्षेप केल्यास याचे गंभीर परिणाम होतील, अशी धमकीच दिलीय. पुतीन यांनी पश्चिमेकडील अमेरिका तसेच नाटोमधील देशांना उद्देशूनच ही धमकी दिल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.