झेलेन्स्की आता थेट आक्रमक पुतिन यांनाच भेटणार; रशिया-युक्रेन शांत होणार?

आपला देश टिकवण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी ही बैठक गरजेची असल्याचंही झेलेन्स्की यांनी सांगितलं.
Volodymyr Zelensky  and Vladimir Putin
Volodymyr Zelensky and Vladimir Putin Volodymyr Zelensky and Vladimir Putin
Updated on

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेल्या तीन महिन्यांपासून सुरुच आहे. या युद्धाची तीव्रता कमी-अधिक होत असली तर युद्ध थांबण्याची चिन्हं काही दिसत नाहीयेत. जगभरातले अनेक देश युद्ध संपवण्याची मागणी करत प्रयत्न करत आहेत. आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेण्याचंच ठरवलं आहे. (Volodimir Zelensky to meet Vladimir Putin to end russia ukraine war)

Volodymyr Zelensky  and Vladimir Putin
Cannes 2022 : झेलेन्स्की म्हणाले, 'हुकुमशहांचा अंत होईल आणि...'

झेलेन्स्कींनी (Volodimir Zelensky) पुतिन यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. जर पुतिन चर्चेसाठी तयार असतील तर युद्ध संपवण्यासाठी युक्रेनही चर्चा करायला तयार आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमक हल्ले सुरुच असताना रशियासोबत चर्चा करण्याची इच्छा नाही. पण युक्रेनमधल्या नागरिकांना सामान्य जीवन जगता यावं, यासाठी चर्चा हाच एक मार्ग आहे. हे युद्ध संपायला हवं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Volodymyr Zelensky  and Vladimir Putin
"...म्हणून युक्रेनवर हल्ला करावा लागला"; पुतिन यांचं युद्धाला समर्थन

आपला देश टिकवण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी ही बैठक गरजेची असल्याचंही झेलेन्स्की यांनी सांगितलं. त्यामुळे युक्रेनचे नागरिक देशात परतू शकतील. तसंच यामुळे जगात शांतता टिकून राहील, असंही ते म्हणाले. या आधीही झेलेन्स्की यांनी हे स्पष्ट केलं होतं की ते आता कोणाच्याही माध्यमातून चर्चेला तयार नाहीत. त्यांना फक्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांच्याशीच चर्चा करण्यात रस नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()