आता रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी किववर चौफेर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
युक्रेनची राजधानी किवमध्ये रशियाने (Russia) हल्ल्याचा प्रयत्न केला. तो हल्ला हाणून पाडल्याचा दावा युक्रेनने (Ukraine) केला आहे. दरम्यान, आता रशियन सैन्याला किववर चौफेर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किवमध्ये अनेक ठिकाणी हल्ला झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हे युद्ध रोखण्यासाठी युरोपियन संघाकडून (European Union) रशियावर निर्बंध लादले जात आहेत.
स्पुटनिक व्ही लस युरोपियन युनियन देशांमध्ये बॅन करण्यात आल्याची माहिती युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी दिली आहे.
दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की, भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासंदर्भातील सर्व इत्यंभूत माहिती देणारे एक अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट केवळ याच कारणासाठी समर्पित असेल. 'OpGanga Helpline' असं या ट्विटर अकाउंटचं नाव आहे. युक्रेन समस्येसंदर्भातील सर्व शंका आणि प्रश्न या ट्विटर हँडलवरच विचारण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
युक्रेनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली.
युक्रेनमधून बाहेर काढलेले भारतीय विद्यार्थी तिरुअनंतपुरममध्ये पोहोचले आहेत.
युक्रेनने आज रशियाशी शांतता चर्चेसाठी तयार असल्याचं कळवलं आहे. - द किव इंडिपेंडंट
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.
युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे. ही प्रक्रिया सरकारी खर्चाने होईल: परराष्ट्र सचिव हर्ष व्ही श्रृंगला
रशियाने युक्रेनवर गुरुवारी आक्रमण केलं आहे. तेंव्हापासून युक्रेनमधून 3,68,000 हून अधिक लोकांनी पलायन केले आहे, अशी एएफपीने माहिती दिली आहे.
व्हिसाशिवाय सर्व भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये प्रवेशाला परवानगी
युक्रेनमधून बाहेर पडलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसाशिवाय पोलंडमध्ये प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोवस्की यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेले गुजरातचे विद्यार्थी अहमदाबादमध्ये पोहोचले. या विद्यार्थी काल रात्री मुंबई विमानतळावर उतरले होते.
रशियाने चर्चेसाठी प्रस्ताव दिल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपण तयार असल्याचं म्हटलं. मात्र बेलारूसमध्ये चर्चेला तयार नाही कारण बेलारूसचा हल्ल्यासाठी लाँचपॅड म्हणून वापर केल्याचा आरोप त्यांनी केलाय. बेलारूस ऐवजी वारसॉ, ब्रातिस्लावा, बुडापेस्ट, इन्स्ताबुल किंवा बाकु यापैकी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यासाठी तयार आहे असं झेलेन्स्की यांनी सांगितले.
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं की,'रशियाचे प्रतिनिधी चर्चेसाठी तयार आहेत आणि आता युक्रेनच्या प्रतिनिधींची आम्ही वाट पाहतोय'
रशियन सैन्याचा खार्किवमध्ये प्रवेश
रशियन सैन्य युक्रेनमधील दुसरं शहर खार्किवमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तिथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरु असल्याची माहिती विभागीय प्रशासनाने दिली असल्याचं वृत्त एएफपी न्यूजने दिलं आहे.
बायडेन म्हणतात, 'आता दोनच पर्याय'
अमेरिका, ब्रिटनसह २८ देशांनी युक्रेनला वैद्यकीय साहित्य आणि लष्करी मदत द्यायचं मान्य केलं आहे. याशिवाय युक्रेनला शस्त्रे उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशिया युक्रेन संघर्षावर दोन पर्याय समोर ठेवले आहेत. त्यांनी म्हटलं की, रशियाकडून युक्रेनवर ज्या पद्धतीने हल्ला सुरु आहे त्यावरून तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे. रशियासोबत युद्ध करून तिसऱं महायुद्ध किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधात जाऊन असं कऱणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल हे ठरवणं. जे आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लादण्यात आले आहेत ते इतिहासातील सर्वात मोठे निर्बंध असल्याचंही बायडेन यांनी सांगितले.
खार्किवमध्ये गॅस पाइपलाईन उडवली
युक्रेनचं म्हणणं आहे की, रशियन सैन्याने खारकिवची गॅस पाइपलाइन उडवली आहे. खारकिव हे युक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे किवमधील एक ऑइल टर्मिनल उद्ध्वस्त झालं आहे. शहराच्या महापौरांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अमेरिकेतील एका खासगी कंपनीने सॅटेलाइट फोटो शेअर केले आहेत. यात दावा करण्यात आला आहे की, युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर रशियाने ताबा मिळवला आहे. रशियाने युक्रेनमधील नोवाकाखोवकातील नीपर नदीजवळ त्यांचे लष्कर एकत्र केले आहे.
रशियन सैन्याने शनिवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा युक्रेनमधील अनेक शहरांवर आर्टिलरी आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी राजधानी किव युक्रेनच्याच ताब्यात असल्याचं सांगितलं. शनिवारी पहाटेच्या सुमारास किव शहरात तोफ आणि गँड मिसाइलचा मारा करण्यात आल्याचे आणि स्फोटाचे आवाज झाले.
राजधानी किवमध्ये कर्फ्यू लागू
किवमध्ये होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीवर शत्रूसारखी कारवाई करण्याचे आदेश युक्रेनने सैन्याला दिले आहेत.
जर्मनीने युक्रेनला रॉकेट लाँचर देण्याचा निर्णय घेतला आहे तर अमेरिकेनं आधीच ३५ कोटी डॉलरची लष्करी मदत देऊ अशी घोषणा केली आहे. जर्मनीसह पाश्चिमात्य सहकारी देशांनी रशियाला स्विफ्टमधून बाहेर करण्यावर एकमत दर्शवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.