रशियाकडून अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर - अँटनी ब्लिंकन

अमेरिकेचा आरोप; युद्धामुळे व्यापार ठप्प झाल्याची टीका
Russia Using food grains as weapon Allegations USA Anthony Blinken
Russia Using food grains as weapon Allegations USA Anthony Blinkensakal
Updated on

न्यूयॉर्क : रशियाने युक्रेनमधील आपला हेतू साध्य करण्याच्या हट्टापायी जगातील लाखो लोकांना उपयुक्त ठरू शकणारे धान्य बळजबरीने स्वत:च्या ताब्यात ठेवत या अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर सुरु केला आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आज केला. अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत ब्लिंकन यांनी युक्रेन-रशिया युद्धामुळे होत असलेल्या नुकसानीचा पाढा वाचला.

ते म्हणाले,‘‘युद्धामुळे काळ्या समुद्रातून होणारा अन्नधान्याचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे युक्रेनमधून अनेक देशांमध्ये होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबला असून अन्नपुरवठा साखळीवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.

रशियाने अन्नधान्याचा शस्त्र म्हणून वापर सुरु केला आहे. यामुळे जगात अनेक ठिकाणी भुकेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.’’ अझोव्ह आणि काळ्या समुद्रात रशियाने आपल्या युद्धनौका तैनात करून तेथून युक्रेनवर हल्ले केले जात असल्याने या सागरी मार्गांवरून होणारा व्यापार थांबला आहे. परिणामी युक्रेनच्या गोदामांमध्ये दोन कोटी टन अन्नधान्य निर्यातीविना पडून आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • युक्रेनमधील युद्धाची व्याप्ती वाढण्याचा फ्रान्सचा इशारा

  • अमेरिका युक्रेनला ४० अब्ज डॉलरची मदत पाठविणार

  • पूर्वेकडील दोन्बास भागात रशियाकडून आणखी तीव्र हल्ले

  • लुहान्स्कमध्ये रशियाच्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू

  • रशिया सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या रशियन संगीतकाराला दंड

आरोप फेटाळला

अमेरिकेच्या आरोपाचा रशियाने इन्कार केला. ‘सर्वांची उपासमार करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा आरोप चुकीचा आहे. केवळ अमेरिका आणि युक्रेनलाच लोकांच्या जीवाची काळजी आहे, असे नाही,’ असे रशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया म्हणाले. रशियाने नाही, तर युक्रेननेच १७ देशांची ७५ जहाजे अडकवून ठेवली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()